ETV Bharat / health-and-lifestyle

मेणासारखं वितळेल शरीरातील कोलेस्ट्रॉल; आहारात 'या' पदार्थाचा करा समावेश - BENEFITS OF AJWAIN

Benefits Of Ajwain: कित्येक उपाय करूनसुद्धा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत नाही. यामुळे वजन वाढतं. शिवाय आरोग्याविषयक अनेक समस्या उद्भवतात.

Benefits Of Ajwain
ओवा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Oct 18, 2024, 3:51 PM IST

Updated : Oct 18, 2024, 5:36 PM IST

Benefits Of Ajwain: प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या पदार्थामध्ये ओवा असतोच असतो. आयुर्वेदात ओव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपचन, गॅस, पोटदुखी तसंच आतड्यांसंबंधित अनेक समस्यांवर उपाय म्हणून ओव्याचा वापर केला जातो. ओव्यामध्ये कार्मिनेटिव, अँटीमाइक्रोबियल आणि यकृत संरक्षक गुणधर्म असतात. तसंच रक्तदाब कमी करण्यासाठी देखील ओवा रामबाण आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन प्रथिनं, फटी अ‍ॅसिड सारखे शरीराला आवश्यक पोषक घटक असतात. त्याचबरोबर सायमेन, टेरपीनेन, थायमॉल तसंच लिमोनेन यासारख्या तेलांनी देखील ओवा परिपूर्ण आहे. आतड्याचं आरोग्य सुधारण्यासह वजन कमी करण्यासाठी ओवा उपयुक्त आहे. हाच तो पदार्थ आहे जो शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा वितळवू शकतो. चला जाणून घेऊया कसा करावा याचा उपयोग.

  • रक्तदाब कमी करतं: ओव्यामधील थायमॉल नावाचं घटक, कॅल्शियमला रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उंदरांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
  • पाचक आरोग्य : ओव्यामध्ये असलेले सक्रिय एन्झाईम पोटातील आम्लाचा प्रवाह सुधारतात. ज्यामुळे अपचन, पोट फूगणे आणि गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळते. आतड्यांवरील जखमा बऱ्या करण्यासाठी आणि पेप्टिक अल्सरवर उपचार करण्यासाठी देखील ओवा फायदेशीर आहे.
  • उच्च कोलेस्टेरॉलची समस्या दूर: उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांनी ओव्याचं पाणी पिल्यास शरीरात तयार झालेलं कॉलेस्ट्रॉल विरघळवते. तसंच ओव्याच्या सेवनामुळे मेटाबॉलिज्म वाढते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसंच आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतात आणि वजनही कमी होते. ओव्यातील औषधी गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
  • सांधेदुखीपासून आराम: ओवा सांधेदुखी आणि शरीरावरील सूज कमी करण्यास देखील मदत करते. संधिवाताच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी ओव्याची पेस्ट सांध्यांवर लावता येते. अंघोळीच्या कोमट पाण्यामध्ये मूठभर ओवा घातल्यास हे फायदेशीर ठरू शकते.
  • खोकल्यापासून आराम: ओवा एक अ‍ॅंटीकफ एजंट आहे. यामुळे खोकल्याची समस्या दूर होते. तसंच नाकातील श्र्लेष्मा साफ करते. यामुळे श्वास घेणे सोपं होते. तसंच हे ब्रोन्कियल नलिका विस्तारण्यास देखील मदत करू शकतं. जे दमा असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
  • दातदुखीपासून आराम: ओवामध्ये असलेल्या थायमॉल आणि इतर आवश्यक तेलांच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे दातदुखी कमी करण्यास मदत करू शकते. थायमॉल तोंडातील बॅक्टेरिया आणि बुरशीशी लढून तुमचे तोंडी आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

असं करा ओव्याचं सेवन

  • एक पातीलं घ्या एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा घाला आणि पाच मिनिटं उकळा. हे गरम पाणी सकाळ संध्याकाळ प्यायल्यानं शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
  • चपाती आणि पराठ्यांमध्ये घातल्यास सुद्धा उत्तम.
  • चव वाढवण्यासाठी चिकन, मासे, बीन्स, विविध धान्ये, मांस, तांदूळ, सूप, सॉसमध्ये सुद्धा ओवा घालू शकता.
  • मेथी, हळद आणि मोहरी मिक्स करून लोणच्याच्या मसाल्यात देखील ओवा घालू शकता.
  • त्याचप्रमाणे 25 ग्रॅम ओवा एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. तज्ञांचं म्हणणं आहे की, हे पाणी सकाळी प्यायल्यानं अनेक फायदे होतात.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4096002/

https://www.webmd.com/diet/health-benefits-ajwain

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. काळवंडलेल्या काखेमुळे परेशान आहात? हे घरगुती उपाय करून पहा
  2. काळवंडलेल्या मानेमुळे त्रस्त आहात? अशी करा चुटकीसरशी सुटका

Last Updated : Oct 18, 2024, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.