ETV Bharat / health-and-lifestyle

उपाशी पोटी धण्यांचे पाणी पिण्याचे अद्भुत फायदे; मधुमेहासह वजनही नियंत्रणात - Benefits of soaked coriander water

Benefits of soaked coriander water : आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या अनेक औषधोपयोगी मसाल्यांची आपल्याला पुरेशी माहिती नसते. आरोग्य चांगलं रहावं म्हणून आपण वारंवार डॉक्टरांकडं जातो आणि पैसे खर्च करतो. परंतु, घरात सहज उपलब्ध असलेल्या आपण आरोग्यविषयक घटकांपासून अलीप्त आहोत. त्यापैकीच एक आहे कोथिंबीर. ज्याला धणे म्हणूनही ओळखलं झातं. चला तर मग जाणून घेऊया धण्यांचे आरोग्यविषयक फायदे.

Benefits of soaked coriander water
धण्यांचे पाणी पिण्याचे अद्भूत फायदे (CANVA)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 7, 2024, 5:19 PM IST

हैदराबाद Benefits of soaked coriander water : भारतीय जेवणातील रुटकरता वाढवणारा एक घटक म्हणजे धणे. कोथिंबीर, धणे किंवा धणे पावडर या सर्व पदार्थांचा वापरामुळे जेवन रुचकर होते. परंतु या व्यतीरिक्त धणे आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत. धणे फ्लेवोनोइड, बी कॅरोटीनॉइड, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पॉलीफेनॉल, आयर्न यासारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहेत. धण्यांमुळे कोणते आरोग्यवर्धक फायदे होतात आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती पाहूया.

आहारतज्ज्ञांच्या मते : प्रसिद्ध आहारतज्ञ श्रीमती अनुमापा गिरोत्रा यांच्या मते, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. धण्यांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. कोथिंबीरीची पानं आणि बिया या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत. सकाळी रिकाम्या पोटी धण्यांच पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पचनशक्ती वाढवते, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि मानवी शरीराला डिटॉक्सिफाय करते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा: रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणत्याही रोगाशी लढण्यास मदत मिळते. धणे हा एक उत्तम नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारा पदार्थ आहे. धणे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतं. धण्यांच्या पाण्यात कोविड आणि फ्लू सारख्या धोकादायक विषाणूंशी लढण्याची ताकद असते.

केसांची मजबूती: धण्यांमध्ये व्हिटॅमिन-के, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए भरपूर प्रमाणात असते. केस मजबूत होण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. एक ग्लास पाण्यात धणे भिजवून प्यायल्यानं केस मुळांपासून मजबूत होतात आणि केस गळणे आणि तुटण्याची समस्या कमी होते. कोथिंबीर हेअर मास्कचेही काम करते.

पचन समस्या: धण्यांचं पाणी प्यायल्यानं पचनाच्या समस्याही कमी होतात. सकाळी धण्याचं पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. पचनाचे कार्य देखील जलद करते.

रक्तातील साखरेची पातळी: धण्यांचं पाणी नियमित प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून धण्याचं पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम औषधाचं काम करते.

किडनीसाठी उपयुक्त: धण्याचं पाणी प्यायल्यास किडनी मजबूत होते. मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाविरूद्ध लढा मजबूत करते. शरीराला नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी, विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी धण्याचं पाणी खूप उपयुक्त आहे.

पिंपल्स आणि पिग्मेंटेशन: धण्यांमध्ये असलेलं लोह बुरशीशी लढण्यास मदत करते. त्यांच्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला मऊ त्वचा हवी असेल तर धण्याचं पाणी नियमित प्या.

कोथिंबीरीचे पाणी कसं बनवायचं?: कोथिंबीरचे पाणी बनवण्यासाठी प्रथम एक चमचे कोथिंबीर आणि एक ग्लास पाणी घ्या. रात्रभर भिजू ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोथिंबीर काढून पाणी गाळून प्यावे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. स्वयंपाक घरातील दालचिनी मधुमेहावर रामबाण; 'या' पद्धतीनं उपयोग केल्यास उत्तम परिणाम - Cinnamon Control Sugar Level
  2. महिलांचं वजन अचानक का वाढतं? जाणून घ्या 'ही' कारणं - Weight Gain Causes in Women

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.