ETV Bharat / health-and-lifestyle

उपाशीपोटी पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे; आजच करा सुरु - Benefits Of Drinking Water - BENEFITS OF DRINKING WATER

Benefits Of Drinking Water : अनेकांची सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीनं होते. परंतु शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी गरजेचं आहे. रात्री झोपेत शरीरात अनेक प्रक्रिया सुरु असतात ज्यामुळं शरीरातील पाण्याची पातळी कमी होतं. त्यामुळं उपाशीपोटी पाणी प्यायल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. चला तर मग जाणूया उपाशीपोटी पाणी पिण्याचे फायदे...

Benefits Of Drinking Water
उपाशीपोटी पाणी पिण्याचे फायदे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 22, 2024, 11:27 AM IST

Updated : Aug 22, 2024, 1:24 PM IST

हैदराबाद Benefits Of Drinking Water : एक चांगली सवय आपलं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळं शरीराला उत्तम सवयी लावल्यास तुम्ही सहाजीकच निरोगी राहू शकता. अशीच एक सवय आपण आपल्या रूटीनमध्ये आत्मसात केल्यास आपणास जबरदस्त फायदे होवू शकतात. ती म्हणजे सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे होय. बहुतांश लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पित नाहीत. मानवी शरीराचा 60 टक्के भाग पाण्यावर अवलंबून आहे. किम्स सनशाईन या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम पाणी करतो. पाण्याच्या कमतरतेमुळे बद्दकोष्ठता, सांधेदुखी, स्तनाचा कर्करोग, त्वचा संबंधित आजार, अपचन अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे सुदृढ आरोग्य जगण्यासाठी पाणी किती आवश्यक आहे हे यावरुन आपल्याला कळलं असेलच. चला तर मग जाणूया उपाशीपोटी पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.

पचनसंस्था निरोगी : उपाशीपोटी पाणी प्यायल्यास विषारी पदार्थ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था सुधारते तसंच ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.

डोकेदुखीपासून आराम : डिहायड्रेशनमुळे तुम्हाला सकाळी डोकेदुखी होवू शकते. सकाळी पाणी प्यायल्यानं शरीराला हायड्रेट करुन तुम्ही डोकेदुखी पासून मुक्त होवू शकता.

तणाव कमी होतो : मेंदूतील 70 टक्के ऊती पाण्यापासून बनलेल्या असतात. शरीरातील पाणी पातळी कमी झाल्यास डिहायड्रेशन होते. परिणामी मेंदूलाही ताण जाणवतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे.

रोगप्रतिकार शक्ती सुधारते : रोगप्रतिकार शक्ती चांगली असली की, आपण आजारांचा समाना करु शकतो. परंतु तीच कमकूवत असेल तर आपलं आरोग्य चांगल राहत नाही. त्यामुळे रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं लिम्फॅटिक प्रणाली संतुलित होण्यास मदत होते. संक्रमणांशी लढण्यासाठी ऊर्जा देते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : नियमीत योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं वजन कमी होतो. जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटू शकते. परिणामी तुम्ही कमी कॅलरीज सेवन करता.

कोलन साफ ​​करणे : रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं कोलन साफ ​​होण्यास मदत होते, ज्यामुळे आतड्यांमधून पोषक द्रव्ये शोषून घेणे सोपे होते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त : रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं रक्त पातळ होतो. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो.

त्वचेची काळजी : चमकदार त्वचा हवी असेल, तर हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. दिवसाची सुरुवात पाण्याने केल्यास विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा कालांतराने स्वच्छ आणि चमकदार होते.

थकवा जाणवत नाही : थकवा जाणवत असेल तर पाणी पिणं फायदेशीर आहे. त्यामुळे नियमित योग्य प्रमाणत पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरण साखली सुरळीत राहते. तसंच शरीराला ऊर्जाही मिळते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. तुमच्या जिभेचा रंग कोणता आहे? रंगावरून ओळखा शरीरात असणारे आजार - Tongue Color Shows Body Health
  2. उंची, वजन आणि वयानुसार दिवसभरात किती पाणी प्यावं? - How Much Water in a Day
  3. दुपारी डुलकी घेणे आरोग्यासाठी फायदेशीर की तोट्याचं, जाणून घ्या फायदे - Daytime Sleep

Last Updated : Aug 22, 2024, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.