ETV Bharat / health-and-lifestyle

शतावरी सेवनाचे जादुई फायदे; महिलांबरोबरच पुरुषांसाठी फायदेशीर - Asparagus Benefits

author img

By ETV Bharat Health Team

Published : 2 hours ago

Asparagus Benefitst:शतावरी हे एक बहुमुखी आयुर्वेदिक औषध आहे. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. तज्ञांच्या मते, शतावरीचे नियमित सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु शतावरी सेवनाशी संबंधित खबरदारी आणि इतर महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Asparagus Benefits
शतावरी सेवनाचे जादुई फायदे (ETV Bharat)

Asparagus Benefits : आपल्या परिसरातील औषधी गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पतींपासून आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्या फायद्यापासून दूर रहावं लागतं. अशीच एक औषधी वनस्पती जी आपल्या भोवताली असते. ती म्हणजे शतावरी. शतावरीचे अनेक फायदे आपल्याला माहिती नाहीत. ज्यांना माहिती आहे त्यांना वाटतं की, ती केवळ महिलांसाठीच फायदेशीर आहे. परंतु शतावरी पुरुषांसाठी देखील उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते, आयुर्वेदामध्ये शतावरीचा उपयोग प्राचीन काळापासून अनेक रोगांवार उपचारासाठी केला जातो. यात अनेक रोगांच्या प्रतिबंध आणि निदानासाठी आवश्यक गुणधर्म तर आहेतच, शिवाय त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आहेत. यामुळे याच्या सेवनानं शरीराला नैसर्गिकरित्या निरोगी राहण्यास मदत होते.

शतावरीचे फायदे: शतावरी विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांसाठी वापरली जाऊ शकते, असं आरोग्यधाम आयुर्वेदिक हॉस्पिटल, मुंबईच्या डॉ. मनीषा काळे सांगतात. शरीराचे हार्मोनल आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी देखील शतावरी फायदेशीर आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला हानिकारक घटकांपासून वाचवतात, असं देखील त्यांचं म्हणंण आहे.

शतावरी सेवन स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण ते हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. शिवाय, पुरुषांसाठी देखील फायदेशीर आहे. पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यास ते मदत करते. याशिवाय शतावरीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार शतावरीचे नियमीत सेवन केले पाहिजे.

शतावरीचे अनेक फायदे आहेत, त्यातील काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

  • शतावरी स्त्रियांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते. मासिक पाळी दरम्यान पोटात उठणारे पेटके आणि वेदना कमी करण्यासाठी देखील ते प्रभावी आहे. तसंच रजोनिवृत्तीची लक्षणं देखील ते कमी करते.
  • शतावरी खाल्ल्यानं स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये दूध उत्पादन सुधारते.
  • शतावरी पुरुष आणि स्त्रिया दोघांचे पुनरुत्पादक आरोग्य सुधारते. स्त्रियांमध्ये अंड्याची गुणवत्ता सुधारते आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढवते.
  • याच्या सेवनानं शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. शतावरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक आणि औषधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात, ज्यामुळे शरीराला अनेक रोगांशी लढण्याची ताकद मिळते.
  • शतावरी पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
  • मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. शतावरीचं सेवन केल्यानं मन शांत होते, तणाव आणि चिंता कमी होते.

खबरदारी : कोणताही आजार किंवा समस्या असल्यास वैद्यकीय सल्ल्यानंतरच शतावरी वापरावी, असं डॉ.मनिषा काळे सांगतात. याशिवाय काही परिस्थितींमध्ये शतावरीचे सेवन टाळावे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

  • जे लोक रक्तदाबाची औषधं घेतात त्यांनी शतावरी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण शतावरी रक्तदाबावर प्रभावित करू शकते.
  • गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शतावरी सेवन करू नये, कारण गर्भधारणेदरम्यान काही प्रकरणांमध्ये ते हानिकारक असू शकते.
  • काही लोकांना शतावरीची ऍलर्जी असते. अशा लोकांनी शतावरीचे सेवन करू नये.
  • मूत्रपिंडाच्या समस्येनं त्रस्त लोकांनी शतावरी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण त्यात मूत्रवर्धक गुणधर्म आहेत ज्यामुळे मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो.

कसे वापरावे?: ''डॉ. मनीषा काळे याच्या मते, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर योग्य आणि नियमितपणे शतावरी सेवन केल्यानं अनेक आरोग्य फायदे होवू शकतात. वास्तविक औषधं शतावरीच्या मुळांपासून बनवली जातात. याशिवाय त्याची पावडर, कॅप्सूल, गोळ्या आणि सिरपही बाजारात उपलब्ध आहेत. शतावरी पावडर किंवा गोळ्या कोणत्याही माध्यमात विशेषतः दुधासोबत घेतल्यास अनेक फायदे होतात.''

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

'या' हर्बल चहानी करा दिवसाची सुरुवात; रक्तदाब राहील नियंत्रणात - Herbal Tea Controls Blood Pressure

जेवणानंतर बडीशेप खाणं कितपत सुरक्षित? - Health Benefits Of Fenne

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.