हैदराबाद Ashadhi Ekadashi Recipes : आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) यंदा 17 जुलैला आहे. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. वारकरी संप्रदायाचा मोठा दिवस म्हणून आषाढी एकादशी राज्यभर उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने संपूर्ण दिवस एकादशीचा उपवास घरातील सर्व लोक करतात.
1) वरीचा भात आणि आमटी -
- साहित्य : 1 कप वरीचे तांदूळ, जिरे 2 टेबलस्पून, साजूक तूप 2 टेबलस्पून, 2 कप पाणी
- कृती : वरीचा भात बनवण्यासाठी एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे फोडणीला घालावेत. जिरे फुलल्यानंतर त्यात भिजवून घेतलेली वरी घालावी. त्यानंतर साजूक तुपामध्ये ही वरई चांगली खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावी. त्यानंतर त्यात गरम पाणी घालावे. आता या भांड्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफेवर भात शिजवून द्यावा आणि आपला वरीचा भात खाण्यासाठी तयार आहे.
शेंगदाण्याची आमटी -
- साहित्य : भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1/ 2 कप, आलं 1 लहान तुकडा, किसलेलं ओल खोबर 1 वाटी, हिरव्या मिरच्या 4, उकडवून घेतलेला 1 बटाटा, चवीनुसार मीठ, जिरे, लाल मिरची पावडर आणि पाणी.
- कृती : शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, किसलेलं ओल खोबर, आलं, हिरव्या मिरच्या आणि गरजेनुसार पाणी घालून त्याची मिक्सरमध्ये पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. आता एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे, उकडलेल्या बटाटा, लाल मिरची पावडर, मीठ घालून परतून घ्या. त्यानंतर यात मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले पेस्ट घालावी. आमटीला एक उकळी आली की, ती खाण्यासाठी तयार होते.
2) साबुदाणा डोसा -
- साहित्य : अर्धा कप साबुदाणा, अर्धा कप भगर, एक बटाटा, शेंगा कूट, पाव कप दही, हिरव्या मिरची पेस्ट 1 टीस्पून, जीरेपूड, चवीनुसार मीठ
- कृती : साबुदाणा 4 ते 5 मिनिटे मंद आचेवर थोडा भाजून घ्या. साबुदाणा थंड झाला की, साबुदाणा आणि भगर एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक करून घ्या. फिरवलेले पीठ एका भांड्यात काढून घ्या. यानंतर बटाटा उकडून घ्या आणि मिक्सरमधून बटाट्याची पेस्ट करून घ्या. बटाट्याची पेस्ट साबुदाणा- भगरीच्या पिठात टाका. त्यात शेंगदाण्याचे कूट, मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि जिरेपूड टाका. गरजेनुसार पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि नंतर नेहमीप्रमाणे डोसे करा.
3) उपवासाची मिसळ -
- साहित्य : 1 वाटी शेंगदाणे, 1/2 वाटी काजू, 1/2 वाटी भिजलेला साबुदाणा, ओले खोबरे, उकडलेले बटाटे, जिरे, तूप, मीठ, लाल तिखट, गूळ, हिरवी मिरची, काकडी थोडीशी चिंच, 1 लिंबू, थोडे बटाटा वेफर्स.
- कृती : तुपाची फोडणी करून त्यात मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, शिजवलेले शेंगदाणे, काजू तुकडे घालून परतून घ्या. भिजलेला साबुदाणा, बटाट्याच्या फोडी घालून मीठ घाला. परतून झाल्यावर उसळ बाजूला ठेवा. चिंचेच्या कोळात ओले खोबरे, जिरे घालून बारीक वाटून घ्या. तुपाची फोडणीत जिरे, लाल तिखट घाला आणि वाटण घालून परतून घ्या. यात मीठ, गूळ आणि पाणी घालून रस्सा तयार करा. डिशमध्ये उसळ घालून त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि रस्सा घाला. वरून ओले खोबरे, बारीक चिरलेली काकडी, बटाटा चिवडा घालून लिंबू पिळा आणि थोडा रस्सा वेफर्स सोबत द्या.
4) रताळ्याचा शिरा -
- साहित्य : रताळे, गूळ, साजूक तूप, सुकामेवा इत्यादी साहित्य.
- कृती : गोड स्वादिष्ट रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी पहिला रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यानंतर रताळे सोलून बारीक कुस्करून घ्यावी. एका भांड्यामध्ये साजूक तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये गूळ घालून तो विरघळेपर्यंत ढवळत रहावा. त्यानंतर या मिश्रणात कुस्करलेले रताळे घालून छान एकत्र करावे. हे मिश्रण सारखे ढवळत राहा. त्यामुळं ते पॅनला चिकटणार नाही आणि शिरा देखील मऊ होईल. शेवटी तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूटस घाला आणि शिऱ्याचा आस्वाद घ्या.
5) साबुदाणा खीर -
- साहित्य : 1/4 कप साबुदाणा, 4 टेबलस्पून साखर, 1 लिटर दूध, 4 वेलची, 1 टेबलस्पून तूप , काजू आणि बदाम गार्निशिंगसाठी.
- कृती : 3-4 तास साबुदाणा भिजवून ठेवा. साबुदाणा चांगला भिजला की, एक वाडगा घ्या. त्यात दूध, वेलची आणि साखर घाला. दूध गरम करून घा. दुधाचे मिश्रण काढून त्यात भिजवलेला साबुदाणा आणि तूप घाला. 5 मिनिटे पुन्हा साबुदाणा गरम करा. नंतर खीरीमध्ये काजू आणि बदाम घाला. तुम्ही ते गरम सर्व्ह करू शकता. किंवा 1 तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये खीर ठेवा. थंडगार साबुदाणा खीर सर्व्ह करा.
हेही वाचा -