ETV Bharat / health-and-lifestyle

पिंपल्स कशामुळे होतात, टाळण्यासाठी आजच अवलंब करा डॉक्टरांच्या या टिप्स - Acne prevention tips - ACNE PREVENTION TIPS

Acne prevention tips: जगभरातील लाखो लोक पिंपल्समुळे त्रस्त आहेत. पौंगंडावस्थेत शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो यामुळे पिंपल्स येतात. पिंपल्स येणे ही समस्या कॉमन आहे. चला तर मग जाणून घेऊया काही उपाय जे या समस्येपासून मुक्ती देवू शकतात.

Acne prevention tips
पिंपल्सपासून बचाव करण्याच्या टिप्स (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 3:44 PM IST

हैदराबाद Acne prevention tips : आपला चेहरा ताजातवाना दिसावा चेहऱ्यावर एकही डाग नसावं आणि चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, जवळपास आपल्यातील सर्वांनी कधी ना कधी पुरळ, पिंपल्स येण्याच्या समस्येचा सामना केलाय. विशिष्ट वयोगटातीलच व्यक्तींना पिंपल्स येणार असं काही नियम नाही. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला याचा सामना करावा लागू शकतो. पिंपल्स येणे ही समस्या कॉमन आहे. हे चेहरा, पाठ आणि छातीवर होवू शकतात. ही समस्या सामान्य असली तरी प्रचंड वेदनादायक आहे. मुरुमांमुळे सौंदर्य बिघडतं. नॅशनल हेल्थ सर्व्हिस, यूकेच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या माहितीच्या आधारे, पिंपल्स मागील कारण आणि त्यावरील उपायांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

पिंपल्स, मुरुमांची कारणे : पिंपल्स येण्यामागील मुख्य कारण तरुणवयात होणारे हार्मोनल चेंजेस आहे. परंतु पिंपल्स कोणत्याही वयात होऊ शकतात. प्रदूषण, तेलकट पदार्थाचा आहारात समावेश, आनुवांशिकता तसंच हार्मोनल चढउतार जसं की, मासिक पाळी किंवा गर्भधारणेमुळे पिपंल्स होतात.

लक्षणे आणि मुरुमांचे प्रकार

ब्लॅकहेड्स : ऑक्सिडेशनमुळे त्वचेवर दिसणारे लहान, गडद ठिपके.

व्हाईटहेड्स : पांढरे डाग, पुरळ त्वचेच्या बाहेरील भागावर येतात.

पॅपल्स : Papules : लहान, लाल पुरळ

पस्ट्यूल : Pustules : पापुद्राप्रमाणेच पण टोके पांढऱ्या पूने भरलेली असतात.

नोड्यूल्स : Nodules : त्वचेखालील मोठे, कठीण पुरळ जे वेदनादायक असू शकतात.

प्रामुख्यानं किशोरवयीन आणि तरुण प्रौढांना प्रभावित करते. 11 ते 30 वयोगटातील सुमारे 95 टक्के व्यक्तींना काही प्रमाणात पिपंल्स होतात. 25 व्या वयानंतर आपोआप कमी होतात. परंतु काही व्यक्तींमध्ये ते प्रौढावस्थेत अधिक दिसून येते. त्यावर प्रभावी उपचार केल्याने मुरुमांवर नियंत्रण ठेवता येते. पिंपल्सची सतत समस्या येत असल्यास योग्य उपचार घ्यावा.

पुरळ टाळण्यासाठी काय करावे?

वारंवार धुणे: पिंपल्स ज्या ठिकणी असेल ती जागा वारंवार धुत रहा. याकरिता साबणाचा किंवा क्लिन्झरचा वापर करा. गरम किंवा थंड पाणी वापरू नका

मुरुम पिळणे टाळा: मुरुमांचे डाग टाळण्यासाठी, ब्लॅकहेड्स किंवा डाग पिळून काढण्याचा प्रयत्न करणे टाळा.

नॉन-कॉमेडोजेनिक उत्पादने: छिद्र पडू नये म्हणून पाणी, नॉन-ऑइल-आधारित मेकअप आणि त्वचेची काळजी घेणारे उत्पादने वापरा.

इमोलिएंट्स: कोरड्या त्वचेसाठी सुगंधित नसलेले इमोलिएंट्स वापरा.

अधिक माहितकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.nhs.uk/conditions/acne/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. वयानुसार दररोज किती झोपावं, झोपण्याची आणि उठण्याची सर्वोत्तम वेळ काय? - Right Time To Sleep And Wake Up
  2. शेवग्याची पानं चघळण्याचे चमत्कारिक फायदे; 'या' आजारापासून होते सुटका - Benefits Of Moringa Leaves

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.