ETV Bharat / health-and-lifestyle

नाशिकमध्ये डेंग्यूचं थैमान! महानगरपालिकेकडून रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न, जाणून घ्या नेमका आकडा किती? - Dengue Cases In Nashik - DENGUE CASES IN NASHIK

Dengue Outbreak In Nashik : सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्यानं वाढत असून नाशिकमध्येही डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. मात्र, महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून रुग्णांची आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचं आता उघड झालंय.

434 Dengue Cases Found In Nashik, Municipal Corporation trying to hide number of patients
नाशिक डेंग्यू रुग्ण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 7:38 PM IST

नाशिक Dengue Outbreak In Nashik : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं मोहीम राबवत घराघरातून पाण्याचे सॅंम्पल्स जिल्हा रुग्णालयाच्या सेंटीनेलमध्ये पाठवण्यास सुरुवात केलीय. जुलैच्या अखेरीस 1700 सॅम्पल या सेंटीनेलमध्ये होते. पालिका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर सातत्यानं आकड्यांमध्ये बदल होत होता. शेवटी त्यांनी 311 डेंग्यू बाधित रुग्ण जुलै महिन्यात सापडल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात शासनाला पाठवलेल्या अहवालात 434 रुग्ण असल्याची कबूली त्यांनीच दिल्यानं आकड्यांची लपवालपवी का केली जातेय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

2 लाख घरांची तपासणी : नाशिक शहरात डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या वाढताच नाशिक महानगरपालिकेनं मोहीम हाती घेत शहरातील 2 लाख 4 हजार 891 घरांना भेटी दिल्या असून त्यातील 3 हजार 50 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचा दावा महानगरपालिकेनं केलाय. तसंच जानेवारीपासून आता पर्यंत नाशिक शहरात 699 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं अहवालात म्हटलंय.

नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आकड्यांसोबत खासगी रुग्णालयातील आकडे गृहीत धरल्यामुळं जुलै महिन्यातील डेंग्यू बाधित रुग्णांचा आकडा वाढलाय- डॉ तानाजी चव्हाण, महानगरपालिका वैद्यकीय अधीक्षक

नागरिकांनी ही घ्यावी काळजी : नागरिकांनी देखील डेंग्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूच्या डासांची चांगल्या पाण्यातून उत्पत्ती होते. त्यामुळं घरातील पाणी देखील अलटून-पालटून बदलणं गरजेचं आहे. त्यामुळं स्वतःहून डासांची उत्पत्ती होणार नाही, असं महानगरपालिका मलेरिया विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी सांगितलं.

ही आहेत डेंग्यूची लक्षणं : एडिस डास चावल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर रुग्णाला तापाची लक्षणे दिसायला लागतात, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. अशावेळी त्वरित रक्ताची तपासणी करून घ्यावी. डेंग्यूचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करावा.

हे आहेत उपाय : डासांपासून वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधात्मक मलम वापरा, खिडक्यांना बारीक जाळी बसवणे, अंग झाकून राहतील असे कपडे वापरावेत, गप्पी मासे हे डासांच्या आळ्या खातात. त्यामुळं पाण्याचे मोठे हौद, विहीर इत्यादी ठिकाणी गप्पी मासे टाकावेत. त्यामुळं डासांच्या अळ्या होणार नाहीत.

हेही वाचा -

  1. नाशिकमध्ये पंधरा दिवसात डेंग्यूचे 200 रुग्ण; महानगरपालिकेकडून 12 हजार घरांची तपासणी - 200 Dengue Cases In Nashik
  2. चंद्रपूर जिल्ह्याला 90 हजार मच्छरदाणींची प्रतीक्षा; जिल्ह्यात 132 डेंग्यू तर 252 मलेरियाचे रुग्ण संक्रमित - Mosquito Net issue
  3. स्वाइन फ्लू आणि डेंग्यू रुग्णांची माहिती दडवणाऱ्या 650 रुग्णालयांवर होणार फौजदारी कारवाई - Swine Flu And Dengue Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.