मुंबई - Zaheer Iqbal and Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं नुकतेच अभिनेता झहीर इक्बाल नोंदणीकृत विवाह केला आहे. लग्न होताच झहीरनं पत्नीला 2 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची बीएमडब्लू आय 7 ( BMW i7 ) इलेक्ट्रिक सेडान कार भेट दिली. या कारमध्ये नुकतेच नवविवाहित जोडपे राईड एन्जॉय करताना दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात सोनाक्षी आणि झहीर कारच्या मागच्या सीटवर हात धरून बसलेले दिसत आहेत. सोनाक्षीनं 23 जून रोजी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये नोंदणीकृत विवाह केला.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा डान्स : विवाहनंतर या जोडप्यानं ग्रँड रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती. या पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे कपल डान्स करताना दिसत आहे. सोनाक्षीनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 36व्या मजल्यावर एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. समुद्रासमोर असलेले हे अपार्टमेंट 4,210.87 स्क्वेअर फूटमध्ये पसरली आहे. या अपार्टमेंटची किंमत 11 कोटी रुपये असल्याचं समजतं. सोनाक्षी आणि झहीरनं 'तेरे मस्त मस्त दो नैन', 'चिकनी कमर', 'छैय्या छैय्या' आणि 'आफरीन' या लोकप्रिय गाण्यांवर डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.
सोनाक्षी आणि झहीरचा लूक : मुंबईतील लिंकिंग रोडवर असलेल्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान सोनाक्षीच्या लूकबद्दल सांगायचं झालं तिनं यावेळी चमकदार लाल बनारसी सिल्क ब्रोकेड साडी परिधान केली होती. या साडीवर सोनेरी नक्षीकाम केलं होतं. हे एथनिक फॅशन लेबल 'रॉ मँगो'च्या कलेक्शनमधून घेण्यात आलं होतं. यासह तिनं हेवी ज्वेलरी आणि हेवी मेकअपसह आपला लूक पूर्ण केला होता. दुसरीकडं झहीरनं नक्षीदार हाय नेक जॅकेट आणि मॅचिंग पॅन्टसह पांढरा शर्ट घातला होता. यावर त्यानं ब्राऊन शूज घातले होते. या लूकमध्ये तो खूप देखणा दिसत होता. सोनाक्षी आणि झहीर लग्न खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :
- आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'साठी येणार एकत्र - VAMPIRES OF VIJAY NAGAR
- 'स्त्री 2' टीझरमध्ये श्रद्धा कपूरची धमाकेदार एन्ट्री... राजकुमार, अपारशक्तीसह पंकज त्रिपाठीची उडाली तारांबळ - Stree 2 Teaser
- कमल हासन अभिनीत 'इंडियन 2'च्या ट्रेलरचं काउंटडाऊन सुरू - Indian 2 Trailer