मुंबई - Yuvraj singh : क्रिकेटपटूंच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. महेंद्रसिंग धोनी, कपिल देव, अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट आपण पडद्यावर पाहिले आहेत. क्रिकेटपटूंच्या जीवनावरील अनेक चित्रपट यशस्वी झाले तर काही चित्रपट फ्लॉप ठरले. दरम्यान आणखी एका क्रिकेटरच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. या आगामी चित्रपटामध्ये युवराज सिंगची कहाणी दाखविण्यात येणार आहे. चित्रपटामध्ये क्रिकेटपटूचा संघर्ष, कारकीर्द आणि प्रेमजीवन दाखविण्यात येईल. आता माजी क्रिकेटर युवराज सिंगच्या जीवनावर बायोपिक बनणार असल्याची घोषणी करण्यात आली आहे.
Yuvraj Singh said - " i am deeply honored that my story will be showcased to millions of my fans across the globe. cricket has been my greatest love and source of strength through all the highs and lows. i hope this film inspires others to overcome their own challenges & pursue… pic.twitter.com/L5pk8BiDw9
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 20, 2024
युवराज सिंगवर आधारित बायोपिक : या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि रवी भागचंदका करणार आहेत. या चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये मैदानावरील आणि मैदानाबाहेरील काही उल्लेखनीय गोष्टी दाखवण्यात येईल. दरम्यान युवराजच्या जीवनातील कठीण आव्हान हे कॅन्सरविरुद्धची लढाई होती. याबद्दल देखील या चित्रपटामध्ये दाखवलं जाणार आहे. या बायोपिकच्या घोषणेनं युवराज सिंगचे चाहते आता खुश झाले आहेत. आता चाहते चित्रपटाशी संबंधित अधिक माहितीची वाट पाहात आहेत. या चित्रपटात युवराज सिंगची भूमिका कोण साकारेल याबद्दल अद्याप ठरलेलं नाही.
BIOPIC ON CRICKETER YUVRAJ SINGH ANNOUNCED... BHUSHAN KUMAR - RAVI BHAGCHANDKA TO PRODUCE... In a groundbreaking announcement, producers #BhushanKumar and #RaviBhagchandka will bring cricket legend #YuvrajSingh's extraordinary life to the big screen.
— taran adarsh (@taran_adarsh) August 20, 2024
The biopic - not titled yet… pic.twitter.com/dJYtTgFHIN
युवराज आणि भूषण कुमारनं केल्या व्यक्त भावना : या चित्रपटाबाबत भूषण कुमार यांनी म्हटलं, "युवराज सिंगचं जीवन हे विजय, चिकाटी आणि उत्कटतेची एक आकर्षक कहाणी आहे. एक चांगला क्रिकेटर ते क्रिकेटचा हिरो आणि वास्तविक जीवनात नायक बनण्याचा त्याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. मोठ्या पडद्यावर सांगण्यास आणि ऐकण्यास पात्र असलेली कहाणी आणताना मला आनंद होत आहे." यानंतर युवराज सिंगनं याबाबत अशी अपेक्षा व्यक्त केली, "माझी कहाणी भूषणजी आणि रवी भागचंदका हे जगभरातील माझ्या लाखो चाहत्यांना दाखवेल, याचा मला खूप सन्मान वाटत आहे. क्रिकेट हे माझं सर्वात मोठं प्रेम आणि शक्तीचा स्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या स्वतःच्या आव्हानांवर मात करण्यास प्रेरित करेल."
युवराज सिंगचं योगदान : यानंतर सह-निर्माता रवी भागचंदका, ज्यांनी यापूर्वी 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स'वर काम केलं, त्यांनीही या चित्रपटाविषयी आपली उत्सुकता व्यक्त केली. दरम्यान 2000 ते 2017 पर्यंत युवराज सिंगच्या क्रिकेट कारकिर्दीत 402 आंतरराष्ट्रीय सामने, 11,178 धावा आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2002, आयसीसी टी - 20 विश्वचषक 2007 आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2011 मध्ये भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. 2007 च्या टी - 20 विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध त्यानं एका ओव्हरमध्ये सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम केला होता.