मुंबई - Yo Yo Honey Singh : प्रसिद्ध रॅपर आणि गायक 'यो यो हनी सिंग' नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नात परफॉर्म करताना दिसला होता. यानंतर तो सतत चर्चेत राहिला होता. आता हनी सिंग मुंबई विमानतळावर एका अनोख्या लूकमध्ये दिसला आहे. हनी सिंग विमानतळाबाहेर येताच एका चाहत्यानं त्याच्या पायाला स्पर्श केला. यानंतर हनी सिंगनं एक मजेदार गोष्ट म्हटली. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हनी सिंग कुर्त्यामध्ये दिसत असून त्याची अनोखी स्टाईल ही अनेकांना आवडली आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
'यो यो हनी सिंग'चा व्हायरल : 'यो यो हनी सिंग' एअरपोर्ट लाउंजमधून बाहेर येताच त्याच्या एका चाहत्यानं पायाला हात लावल्यानंतर त्यानं त्याला उभे केले आणि तो म्हातारा झाला नसल्याचं म्हटलं. याशिवाय व्हायरल व्हिडीओबाबत बोलताना हनी सिंगच्या दुसऱ्या चाहत्याच्या छातीवर हर हर महादेव असं लिहिलेलं पाहून त्यानं आनंद व्यक्त केला आणि स्वत: दोन ते तीन वेळा हर हर महादेवचा जयघोष केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवरील कमेंट्स विभाग एका चाहत्यानं लिहिलं, "श्री श्री 1008 'यो यो'जी महाराजला प्रणाम." दुसऱ्या एका चाहत्यानं यावर लिहिलं, "हनी सिंग खूप बदलला आहे."आणखी एक चाहत्यानं लिहिलं, "रितेश देशमुखनंतर, 'यो यो हनी सिंग' देखील अशा लोकांमध्ये येतो जे संस्कृतीबद्दल इतके भावनिक असतात." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
हनी सिंग शेवटी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात दिसला : हनी सिंग उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान हनी सिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो धमाल करताना दिसला होता. हनी सिंगनं सोनाक्षीला दिलेले वचन पूर्ण करून तिच्या लग्नात पाहुण्यांचे मनोरंजन केले होते. हनी सिंग अनेकदा दुसऱ्या देशांमध्ये कॉन्सर्ट करत असतो.