ETV Bharat / entertainment

राज ठाकरे 'येक नंबर' चित्रपटात करणार भूमिका? आमिर खानसह ट्रेलर लॉन्चला लावली हजेरी - YEK NUMBER - YEK NUMBER

Yek Number Marathi Movie :'येक नंबर' चित्रपटाचा मुंबईत ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह अभिनेता, निर्माता आमिर खानसह चित्रपटसृष्टीतील विशेष मान्यवर उपस्थित होते.

Yek Number Marathi Movie
येक नंबर मराठी चित्रपट (Etv bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 10:52 AM IST

मुंबई - Yek Number Marathi Movie : 'येक नंबर' हा मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित या चित्रपटामध्ये अभिनेता धैर्य घोलप आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. दरम्यान 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी हे नामांकित व्यक्ती उपस्थित होते.

'येक नंबर'चा ट्रेलर लॉन्च सोहळा : राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित करण्यासारखा आहे. 'येक नंबर'चं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या 10 ऑक्टोबरला होणार आहे.

'येक नंबर' चित्रपटात दिसणार मलायका अरोरा : ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सध्या या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, 'येक नंबर'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटातून मलायकानं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी चित्रपटातील 'जाहीर झालं जगाला' या प्रेमगीतानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सध्या हे गाणं प्रचंड गाजत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की ! एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय.

राज ठाकरे यांनी केलं विधान : चित्रपटाबद्दल राज ठाकरे यांनी म्हटलं, "ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत, तसेच मोठे चित्रपट आपल्या मराठीतही व्हावेत, असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं. त्यातूनच 'येक नंबर' चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन. त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचं विशेष आभार आहे. या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले. 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा' या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली. एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे."

आमिर खाननं केल्या व्यक्त भावना : यानंतर अभिनेता आमिर खान 'येक नंबर' चित्रपटाबद्दल सांगितलं," येक नंबर' या चित्रपटातील सगळ्यांचे खूप खूप कौतुक आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. मी तेजस्विनी, वरदा, राजेश मापुस्कर आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. या चित्रपटाला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात यश मिळो." या चित्रपटाबद्दल निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी म्हटलं "माझ्या प्रोडक्शन हाऊसला 74 वर्षे झाली. महाराष्ट्रानं मला खूप काही दिलंय. मला खूप आनंद आहे की, महाराष्ट्रानं मला जे दिलं त्याचं ऋण फेडण्याची संधी मला 'येक नंबर'नं दिली आहे. तेजस्विनी आणि टीमनं या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत केली आहे. हा चित्रपट खूप यशस्वी होवो, अशी माझी इच्छा आहे."

आशुतोष गोवारीकर आणि राजकुमार हिरानी केल्या व्यक्त भावना : या चित्रपटाबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी म्हटलं, "मी या चित्रपटाची कथा ऐकली होती. अखेर काही दिवसांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटानं मला अक्षरशः खिळवून ठेवलं. महाराष्ट्राचा प्रत्येक पैलू या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे." या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सांगितलं, "मी ही कथा वाचली, त्यावेळी मी पहिला प्रश्न हा विचारला की, परवानगी मिळणार का? परवानगी मिळाल्यावर बनवणार कसा? कारण हा चित्रपट बनवणे अवघड आहे. आज आपण इथे आहोत म्हणजे, हा चित्रपट उत्तम बनला असणार, याची खात्री आहे." झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला निर्माते आहेत.

हेही वाचा :

  1. 'येक नंबर' बदलणार मराठी चित्रपटांची रूपरेषा, कोण आहे पोस्टरमधील तरुण ? - Yek Number
  2. तेजस्विनीची सह्याद्री फिल्म्स आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट संयुक्तपणे 'येक नंबर'ची करणार निर्मिती - Nadiadwala grand son Entertainment

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.