ETV Bharat / entertainment

यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या घरात लवकरच हलणार पाळणा - आदित्य धर

Yami Gautam pregnant : अभिनेत्री यामी गौतम प्रेग्नेंट असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्या याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहेत.

Yami Gautam Pregnant
यामी गौतम प्रेग्नेंट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 6:29 PM IST

मुंबई Yami Gautam pregnant : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम सध्या चर्चेत आली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिनं आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामी ही गरोदर असल्याचं आता समजत आहे. तिला प्रेग्नेंट होऊन साडेपाच महिने झाले असल्याचं काही बातम्यातून सांगण्यात येत आहे. यामी आणि आदित्य धरनं आतापर्यंत गरोदर असल्याच्या वृत्तावर मौन बाळगले आहे. याबाबत त्यांनी कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. कदाचित यामी तिच्या बाळाला मे महिन्यात जन्म देऊ शकते असं बोलल्या जात आहे.

यामी गौतम प्रेग्नेंट? : यामी गौतम पती आदित्य धरबरोबर एका कार्यक्रमात दिसली. त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येऊ लागल्या. यावेळी ती दुपट्ट्याने पोट लपवताना दिसली. यामी आणि आदित्य लवकरच प्रेग्नेंसीची घोषणा करणार आहेत. याशिवाय सध्या ती तिच्या 'आर्टिकल 370' चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. 'आर्टिकल 370'मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती आदित्यनं केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. यामी आणि आदित्य 'आर्टिकल 370' रिलीज होण्यापूर्वी प्रेग्नेंसीबद्दल घोषणा करतील असा सध्या अंदाज बांधला जात आहे.

यामी गौतमचा विवाह : यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह 4 जून 2021 रोजी झाला होता. दोघांनी 2 वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही 'उरी: सर्जिकल स्ट्राइक'च्या सेटवर भेटले आणि तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नाच्या 3 वर्षानंतर हे जोडपं आई-वडील होणार आहेत. यामी गौतम कलम 370 मध्ये एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट जम्मू-काश्मीर राज्याला कलम 370 दिलेला विशेष दर्जा रद्द करण्याच्या मागणीवर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रोमोमध्ये एक झलक देखील याबद्दल दाखवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा शोध घेताना यामी या चित्रपटात दिसणार आहे. यात साऊथ अभिनेत्री प्रियामणीचीही महत्त्वाची भूमिका आहे.

हेही वाचा :

  1. संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव
  2. 'शिवरायांचा छावा'मध्ये बहिर्जी नाईकची ऐतिहासिक भूमिका साकारणार रवी काळे
  3. चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं 'लव स्टोरिया' वेब सीरीजचा ट्रेलर केला रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.