मुंबई - आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना आपल्या मनातील स्त्रीत्वाच्या भावना व्यक्त केल्या जातात. आलिया भट्टनेही सोशल मीडियावर तिचा आनंद शेअर करून हा दिवस साजरा केला. तिने आपल्या जीवनात भेटलेल्या सर्व महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिची मुलगी राहाने हा दिवस तिच्यासाठी कसा खास बनवला याचाही खास उल्लेख तिने केला आहे.
आपली चिमुकली मुलगी राहाने बनवलेला रेड हार्ट क्राफ्ट दाखवणारा एक फोटो आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पोस्ट शेअर करताना आलियाने सर्व महिलांना केवळ या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवस महिला दिन साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करणारा संदेश लिहिला. तिनं लिहिलं, "माझ्या घरातील लहान महिलेनं माझ्यासाठी हे बनवलंय. मी हे तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आजचा हा दिवस आणि उर्वरीत सर्व दिवस साजरा करण्यासाठी एक मिनीट वेळ जरुर काढा."
तिने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी तिच्या पोस्टला प्रतिसाद दिला आणि आलियावर महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला. आजच्या दिवशी भरपूर प्रेम आणि मनापासून आदर पाठवत आहे त्याचा स्वीकार व्हावा, अशी विनंतीही एकानं केली आहे.
चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकून डार्लिंग सारखा चित्रपट बनवणारी आलिया भट्ट गुंतवणीच्या क्षेत्रातही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. अलिकडे एका मुलाखतीत तिने याविषयी सांगितले होते. महिलांचे सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित केले असल्याचंही ती म्हणाली होती.
चित्रपटाच्या आघाडीवर, आलियाकडे अनेक चित्रपट आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय थ्रिलमध्येही ती काम करणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. आलिया आगामी 'जिगरा' या चित्रपटाची निर्मिती करण जोहरसह करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू व्हायचे आहे. याशिवाय आगामी चित्रपटात ती रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासह संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा -