ETV Bharat / entertainment

बॉबी देओल अभिनीत 'आश्रम 4' वेब सीरीज रिलीजची प्रतीक्षा सुरू - Bobby deol - BOBBY DEOL

Aashram 4 : बॉबी देओल स्टारर 'आश्रम 4' वेब सीरीजबाबत एक अपडेट समोर आली आहे. 'आश्रम' या वेब सीरीजचा चौथा सीझन यावर्षीचं प्रदर्शित होणार आहे.

Aashram 4
आश्रम 4
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 4:26 PM IST

मुंबई - Aashram 4 : बॉबी देओल स्टारर 'आश्रम' ही लोकांची आवडती वेब सीरीज आहे. आतापर्यंत या वेब सीरीजचे तीन सीझन प्रदर्शित झाले आहेत. आता अनेकजण या वेब सीरीजच्या नव्या सीझनची वाट पाहत आहेत. 'काशीपूरवलाले बाबा निराला'चा 'आश्रम 4'च्या माध्यामातून नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीजच्या रिलीज तारखेची चाहत्यांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. चौथ्या सीझनची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी भोपा स्वामी म्हणजेच चंदन रॉय सन्याल यांनी एक इशारा दिला आहे. ही वेब सीरीज कधी रिलीज होऊ शकेल याबद्दल आता सांगण्यात आलं आहे. 'आश्रम 4' चा टीझर फार पूर्वी रिलीज झाला होता.

'आश्रम 4' कधी होणार रिलीज : 'आश्रम 4'च्या निर्मात्यांनी आजपर्यंत अधिकृत रिलीजच्या तारखेबद्दल माहिती दिली नाही, परंतु आता चंदन रॉय सन्याल यांनी याबद्दल सांगितलं आहे. त्यानं एका मुलाखतीत म्हटलं की, ''आश्रम 4' यावर्षी रिलीज होऊ शकते. चौथ्या सीझनचे फक्त काही भाग शूट करायचे बाकी आहेत.'' सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी 'आश्रम 4' हा डिसेंबरमध्ये रिलीज होईल अशी चर्चा होती. आता चंदन रॉय सन्याल यांच्या बोलण्यावरून देखील असं दिसत आहे की, ही वेब सीरीज डिसेंबरमध्येच रिलीज होऊ शकते. यानंतर चंदन यांनी पुढं सांगितलं, ''लोक फक्त या शोबद्दल प्रकाश झा यांच्याशी बोलतात. त्यांना अनेकजण 'आश्रम 4'च्या रिलीजबद्दल विचारतात.''

बॉबी देओलचा आगामी चित्रपट : अ‍ॅनिमल फेम बॉबी देओलला 'आश्रम' वेब सीरीजनं एक वेगळीच ओळख दिली आहे. या शोमुळे तो चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा परत येऊ शकला. त्यानं या वेब सीरीजच्या माध्यामातून अप्रतिम पुनरागमन केलं. यानंतर त्याला अनेक नकारात्मक भूमिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या. या वेब सीरीजमध्ये त्यानं बाबा निरालाची भूमिका साकारली होती.'आश्रम' ही वेब सीरीज जबरदस्त हिट ठरली. दरम्यान बॉबीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'कंगुआ' या चित्रपटामध्ये सुर्याबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रतीक गांधी आणि विद्या बालनचे 'दो और दो प्यार'मधील 'जज्बाती है दिल' गाणे लॉन्च - Do Aur Do Pyaar song launch
  2. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Bade Miyan Chote Miyan Trailer OUT
  3. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियानं लग्नाचा 14 वा वाढदिवस केला साजरा, फोटो पाहून चाहते चकीत - Nawazuddin Siddiqui and Aaliya

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.