ETV Bharat / entertainment

वायनाड पुनर्वसनासाठी 'पुष्पराज' आला पुढं, केरळ सरकारला दिली लाखो रुपयांची मदत - Kerala CM Relief Fund - KERALA CM RELIEF FUND

Wayanad Landslide: केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनानं अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, पीडितांच्या कुटुंबीयांना आणि पुनर्वसनासाठी सेलिब्रिटींनी हात पुढं केला आहे. अलीकडेच साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुननं पुनर्वसनासाठी केरळचे मुख्यमंत्री यांना मदत निधी दिला आहे.

Wayanad Landslide
वायनाड भूस्खलन (अल्लू अर्जुन- (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 2:11 PM IST

मुंबई -Wayanad Landslide: टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुननं मुख्यमंत्री मदत निधीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. वायनाडमधील विनाशकारी भूस्खलनानंतर पुनर्वसनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी त्यानं एक छोटीशी देणगी दिली आहे. याबद्दल अल्लू अर्जुननं पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. अल्लू अर्जुननं या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून पीडितांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात भीषण भूस्खलन झालं, यात 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अतिवृष्टीमुळे ही घटना घडली, यामुळे भूस्खलन झालं. अनेक लोकांच्या गाड्या आणि घर ही वाहून गेलं. आता अनेक सेलिब्रिटी पुढं येऊन पीडितांची मदत करत आहेत.

अल्लू अर्जुननं वायनाडमधील पीडितांची केली मदत : अल्लू अर्जुननं केरळ मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपये दिल्यानंतर अनेकजण त्याचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. दरम्यान अल्लूनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं की, "वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनामुळे मी खूप दु:खी आहे. केरळनं मला नेहमीच खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे, राज्याच्या पुनर्वसन कार्यात मदत करण्यासाठी, मी केरळ मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपये देणगी देऊन योगदान देऊ इच्छितो. मी तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो." आता अल्लू अर्जुनचे चाहते, त्याच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं यावर लिहिलं, "जगातून सर्वात चांगला हा अभिनेता आहे." आणखी एकानं लिहिलं, "अल्लू अर्जुन हा खरा सुपरस्टार आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

वायनाडसाठी 'या' सेलिब्रिटींनी केली मदत : अल्लू अर्जुनच्या आधी, वायनाडमधील पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी अनेक सेलिब्रिटी पुढे आलेले आहेत. यात नयनतारा आणि तिचा पती-दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीला 20 लाख रुपये दिले आहेत. याशिवाय साऊथ 'सिंघम' सुर्या, विक्रम, कमल हसन, कार्ती, रश्मिका मंदान्ना, ज्योतिका, मल्याळम चित्रपटाचं आयकॉन मोहनलाल, मामूट्टी, दुल्कर सलमान, टोविनो थॉमस, परली मणी आणि फहद फासिल यांनीही केरळच्या मुख्यमंत्र्यांना मदत निधी दिला आहे.

हेही वाचा :

  1. सुकुमारनं रामोजी फिल्म सिटीमध्ये पुन्हा सुरू केलं 'पुष्पा 2' चं शूटिंग, जाणून घ्या अल्लू अर्जुन कधी होणार सामील - Pushpa 2 Update
  2. 'पुष्पा 2' ची प्रतीक्षा सुरू असताना अल्लू अर्जुनच्या पत्नीनं शेअर केलेल्या रोमँटिक फोटोमुळे इंटरनेटवर वादळ - ALLU ARJUN LATEST NEWS
  3. अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह युरोपमध्ये सुट्टीवर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - allu arjun

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.