ETV Bharat / entertainment

सशस्त्र रक्षकांसह सलमान खानची एअरपोर्टवर एन्ट्री, जॅकलिन फर्नांडिस कान्सला रवाना - Salman Khan - SALMAN KHAN

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुंबई विमानतळावर दिसून आले. शनिवारी सकाळी, सलमान खान मुंबई विमानतळावर सुरक्षा पथक आणि बंदूकधाऱ्यांसह पोहोचला आणि जॅकलीन कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 ला जात असताना तिनं पापाराझींचं लक्ष वेधून घेतलं.

Salman Khan and Jacqueline Fernandez at Mumbai Airport
सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुंबई विमानतळावर ((Video grabs))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 2:02 PM IST

सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस मुंबई विमानतळावर ((Video grabs))

मुंबई - सलमान खान शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडल्याचं दिसलं. तो आपल्या कारमधून विमानतळावर पोहोचला. त्यावेळी त्याच्या गाडीतही सुरक्षा रक्षक होते. त्याची गाडी थांबताच सुरक्षा रक्षकांनी त्याच्या भोवती कवच निर्माण केलं आणि तो थेट विमानतळात प्रवेश करताना दिसला. यावेळी उपस्थित पापाराझींनी त्याचे व्हिडिओ आणि फोटो घेण्याचे प्रयत्न केले परंतु रक्षकांनी त्यांना एका विशिष्ठ अंतरावरच रोखून धरलं. त्याच्याबरोबर मोठा सशस्त्र सुरक्षा रक्षकांचा फौज फाटा होता. विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना होण्यासाठी निघालेली जॅकलीन फर्नांडिसही विमानतळावर दिसली.

सलमानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली होती. असं असलं तरी सलमाननं आपलं ठरलेलं शूटिंगचं काम सुरू ठेवलंय. अशा घटनांनी त्याच्या वेळापत्रकात व्यत्यय आणू न देण्याचा निर्धार त्यानं केला आहे. सलमान विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याच्या पाठीमागे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरले होते आणि त्याच्या बाजूला गाड्या आणि सशस्त्र रक्षक होते.

निळा डेनिम शर्ट, राखाडी डेनिम पँट आणि काळी बकेट हॅट घातलेला सलमान खान कॅज्यअल पण स्टायलिश पेहराव केलेला दिसला. सलमानने आत्मविश्वास आणि करिष्मा व्यक्त केला. त्याच्या कारमधून बाहेर पडण्यापूर्वी, विमानतळ सुरक्षेने मीडिया आणि चाहत्यांना दूर ठेवून त्याच्यासाठी एक मार्ग सुनिश्चित केला. त्याच्या सुरक्षा पथकाबरोबर सलमान आत्मविश्वासानं विमानतळावर गेला.

नुकत्याच घडलेल्या सुरक्षेच्या घटनेनंतर, सलमानच्या सार्वजनिक हजेरीबरोबरच सुरक्षा उपायांमध्येही वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेची आव्हानं असूनही तो त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगवर लक्ष केंद्रीत करत आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बरोबर काम करेल. साजिद नाडियादवाला प्रस्तुत आणि एआर मुरुगदोस दिग्दर्शित, 'सिकंदर' २०२५ च्या ईदला पडद्यावर येणार आहे.

दरम्यान, जॅकलीन फर्नांडिस कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये तिची उपस्थिती लावण्यासाठीची तयारी करत आहे. तिचा उत्साह व्यक्त करताना, जॅकलीनने आधी शेअर केले होते, "मी या वर्षी पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे, यावेळी सहवासात BMW सह जागतिक व्यासपीठावर दक्षिणपूर्व आशियाई डायस्पोराचे प्रतिनिधित्व करणं आणि प्रतिष्ठित रेड कार्पेटवर चालणं खूप छान वाटतं."

हेही वाचा -

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय स्टार्सचा जलवा... - Cannes 2024 Film Festival

कान्सच्या रेड कार्पेट पदार्पण करण्यापूर्वी थाय हाय स्लिट गाऊनमध्ये झळकली कियारा अडवाणी - Cannes Film Festival 2024

कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवतरली ऐश्वर्या राय - CANNES FILM FESTIVAL 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.