मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचा यंदाचाही वाढदिवस भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षापासून ती नियमितपणे इथं दर्शनासाठी जात असते. यावेळी तिच्या तिरुमाला तिरुपतीच्या भेटीत तिच्यासह कथित प्रियकर शिखर पहारिया आणि जवळचा मित्र ओरहान अवत्रामणी उर्फ ऑरी, तिची मावशी माहेश्वरी जान्हवीसह आले होते. तिच्या या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाले आहेत.
तिरुपतीला जाण्यापूर्वी, जान्हवीने गुजरातमधील जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. तिथेही तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या कार्यक्रमात तिने आंतरराष्ट्रीय पॉप क्विन रिहानासह 'धडक' चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावरही थिरकली होती.
तिरुपतीच्या मंदिराच्या भेटीसाठी जान्हवीने लाल रंगाची हाफ-साडी परिधान केली होती ज्यात डँगलर आणि हार होता. दुसरीकडे शिखर आणि ऑरी यांनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता.
आदल्या दिवशी, शिखरने त्यांचे एकत्र फोटो शेअर करून जान्हवीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. यामधील फोटोत ते आयफेल टॉवरसमोर मिठी मारताना दिसले होते. दुसऱ्या एका फोटोत जान्हवी तिच्या कुत्र्यांसह आराम करत होती.
जान्हवीच्या वाढदिवशी मैत्री मुव्ही मेकर्सने जाहीर केले की जान्हवी राम चरणच्या RC16 चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील होणार आहे. प्रॉडक्शन कंपनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिचे स्वागत केले, तिला "स्वर्गीय सौंदर्य" असलेली अभिनेत्री म्हटले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'आरसी 16' असे तात्पुरते शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना करत आहेत.
याशिवाय जान्हवी 'देवरा' या चित्रपटातही काम करत असून याच्या निर्मात्यांनी देखील जान्हवीचा तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पणाबद्दल तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या एका जबरदस्त लुकचे लॉन्चिंग केले. कोरटाला सिवा दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागांचा प्रकल्प आहे ज्यात ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.
जान्हवी शेवटची वरुण धवनसोबत 'बवाल'मध्ये दिसली होती. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि शशांक खेतान दिग्दर्शित 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'मध्ये ते पुन्हा एकत्र येणार आहेत. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा -