मुंबई Virat Kohli and Anushka Sharm : क्रिकेटर विराट कोहलीबद्दल एक बातमी आली आहे. विराटनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. विराट कोहली दोन कसोटी सामने खेळणार नाही, त्यामुळे आता अनेकजण असा अंदाजा लावत आहेत की, अनुष्का शर्मा गरोदर आहे. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा बऱ्याचं दिवसांपासून सुरू आहेत. भारतीय क्रिकेट मंडळ बीसीसीआयनं या मालिकेतून कोहलीचं नाव मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात विराट कोहलीनं कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलेलं नाही.
विराट कोहलीनं घेतली रजा : विराट कोहलीनं, वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून आपलं नाव मागे घेण्याची विनंती बोर्डाकडे केली होती. यानंतर बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रक जारी करत यात सांगितलं की, ''विराट कोहलीला देशाचे प्रतिनिधित्व करायला नेहमीच आवडते. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे तो 2 सामन्यात उपस्थित राहणार नाही.'' याआधी विराट कोहलीनं अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातून सुट्टी घेतली होती, तेव्हाही चाहत्यांनी दावा केला होता की, अनुष्का शर्मा प्रेग्नंट आहे आणि यामुळेचं विराट हा सामना खेळला नाही.
अनुष्का शर्मा प्रेग्नंट : आता अनुष्काचे चाहते ज्युनियर कोहली येतोय की, काय असा प्रश्न विराटला विचारताना दिसत आहेत. विराट कोहली, अनुष्का शर्मा 2023 मध्ये चर्चेत होते. हे जोडपं ऋषिकेश, उज्जैन आणि वृंदावन सारख्या धार्मिक ठिकाणी दिसले. महाकालेश्वर मंदिरातील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. 2023 च्या विश्वचषकातही या जोडप्यानं लोकांची मनं जिंकली होती. मात्र, या जोडप्यानं अद्याप दुसऱ्या मुलाच्या आगमनाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात अनुष्काचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे, त्यामुळे विराटचे चाहते खुश आहेत. अनुष्का देखील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसत आहे.
हेही वाचा :