मुंबई - Mohanlal Dance : मल्याळम सुपरस्टार मोहनलालच्या अलीकडच्या एका अवॉर्ड शोमध्ये डान्स परफॉर्मन्सनं त्याच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. याच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 'जवान' चित्रपटातील अनिरुद्ध रविचंदरच्या 'जिंदा बंदा' या गाण्यावर त्यानं डान्स करुन प्रेक्षकांना मोहित केलं. याच पुरस्कार सोहळ्यातील मोहनलाल आणि मामूट्टी यांनी एकत्र घालवलेले हृदयस्पर्शी क्षण असलेले काही फोटोही व्हायरल झाले आहेत. या व्हायरल फोटोमध्ये मोहनलाल मामूट्टीच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे.
सोशल मीडियावर फॅन पेजेसने शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये मोहनलाल तपकिरी लेदर जॅकेट आणि पँटसह प्रिंटेड शर्ट घातलेला दिसत आहे. वयाच्या 63 व्या वर्षीही त्यानं दाखवलेली डान्समधील लवचिकता, जबरदस्त फुट स्टेप्स आणि चेहऱ्यावर दिसलेला आत्मविश्वास याने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि त्याच्यासह शाहरुख खानच्या चाहत्यांकडून प्रशंसा मिळवली आहे.
शाहरुख खानच्या 'जिंदा बंदा'साठी सेट केलेल्या त्याच्या दमदार परफॉर्मन्सने त्याच्या आणि शाहरुख अशा दोन्ही चाहत्यांकडून प्रशंसा मिळाली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मोहनलालाच्या कौतुकाने गजबजलेलं पाहायला मिळालं. चाहत्यांनी त्याच्या डान्सचं स्वागत केलं आणि परिपूर्ण अभिनेता म्हणून त्याचं कौतुक केलं. मोहनलाल यांना शाहरुखबद्दल विशेष प्रेम आहे. त्याने गेल्या वर्षी X वर एका पोस्टमध्ये शाहरुखला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मोहनलाल आगामी काळात प्रभास आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर कन्नप्पामध्ये पडद्यावर झळकणार आहे. याव्यतिरिक्त, मोहनलाल आगामी चित्रपटासाठी दोन दशकांनंतर अभिनेत्री शोबनासह पुन्हा एकत्र येत असल्याच्या घोषणेने चाहत्यांना आनंद झाला. 'मणिचित्रथाझू' आणि 'थेनमाविन कोम्बथ' यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये यापूर्वी या जोडीच्या केमेस्ट्रीनं विशेष लोकप्रियता मिळवली होती.
हेही वाचा -