ETV Bharat / entertainment

विक्रांत मॅसीची पत्नी शीतल ठाकूरने शेअर केली लग्नाच्या वाढदिवसाची झलक

अभिनेता विक्रांत मॅसी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाची झलक दाखवणारा एक फोटो शीतलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 12:51 PM IST

मुंबई - ( भारत ) - अलिकडेच प्रदर्शित झालेल्या '12th फेल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असलेला अभिनेता विक्रांत मॅसी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांनी त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी शीतलने आनंद आणि प्रेमाने भरलेल्या त्यांच्या खास वाढदिवसाची एक झलक शेअर केली आहे.

Vikrant Massey's wife Sheetal Thakur
शीतल ठाकूरने शेअर केली लग्नाच्या वाढदिवसाची झलक

शीतल ठाकूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सुंदर सजवलेल्या केकचा फोटो शेअर केल आहे. त्यातील एका केकवर या सुंदर डजोडप्याचे नाव लिहिले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "लग्नाला दोन वर्षे! आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा." विशेष म्हणजे अलिकडे 7 फेब्रुवारी रोजी दोघांच्या घरी पहिल्यांदाच पाळणा हालला होता.

घरी मुलगा जन्माला आल्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त करताना लिहिले, " 07.02.2024. या दिवशी आम्ही एक बनलो. आमच्या घरी लेकाचं आगमन झालंय हे सांगताना आनंद आणि प्रेमाने मन भरुन गेले आहे. शीतल आणि विक्रांतवर प्रेम असू द्या."

यापूर्वी विक्रांतने तो आणि त्याची पत्नी शीतल यांना पहिल्या अपत्याची प्रतीक्षा असल्याचे लिहिले होते. यासाठीही त्याने एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर केली होती. मुलाचा जन्म झाल्यानंतर विक्रांतने डॉक्टरांचे मनापासून आभार मानेल. आमच्या आयुष्यात आनंद देण्याचे काम या देवदूतांनी केल्याचं तो म्हणाला. बाळंतपणात काही अडचणी होत्या पण त्यावर मात करत डॉक्टर्सनी आम्हा पती पत्नीला आनंद दिल्याचं त्यानं एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते.

बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट केलेल्या या जोडप्याने 14 फेब्रुवारी 2022 रोजी प्रथम एका छान समारंभात लग्न केले आणि नंतर 18 फेब्रुवारी 2022 रोजी हिमाचल प्रदेशमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केले होते.

'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये एकत्र दिसलेल्या या जोडीने 2019 मध्ये त्यांचा रोका समारंभ आटोपला होता. परंतु कोविडचा संसर्ग सर्वत्र पसरल्याने त्यांच्या लग्नाला विलंब होत गेला होता.

विक्रांत त्याच्या अलिकडे प्रदर्शित झालेल्या '12वी फेल' या चित्रपटाच्या यशाने आनंद घेत आहे. टीव्ही, ओटीटी मालिका आणि चित्रपटांसह असंख्य प्लॅटफॉर्मवर त्याच्या यशामुळे त्याला लोकसंख्येची व्यापक पोहोच मिळाली आहे. विक्रांत आगामी 'फिर आयी हसीन दिलरुबा' या 'हसन दिलरुबा'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. याशिवाय तो 'द साबरमती रिपोर्ट'मध्येही तो दिसणार आहे. चित्रपटात विक्रांत रिद्धी डोगरा आणि राशि खन्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय; सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
  2. 'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या आईनं केला आमिर खानशी असलेल्या नात्याचा खुलासा
  3. 'बाफ्टा 2024' चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चं वर्चस्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.