मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी नुकतेच या चित्रपटाचं नवीन पोस्टर शेअर करत टीझरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. राहुल रवींद्रन दिग्दर्शित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना एका महाविद्यालयीन मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कहाणी अनोखी असावी अशी अपेक्षा सध्या अनेकजण करत आहेत. तसेच 'द गर्लफ्रेंड'च्या टीझरला रश्मिकाचा रूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडानं आवाज दिला आहे.
'द गर्लफ्रेंड'चा टीझर कधी होईल रिलीज? : निर्मात्यांनी अलीकडेच पोस्टर शेअर करून 'द गर्लफ्रेंड'च्या टीझर रिलीजच्या तारखेचा खुलासा करून रश्मिका मंदान्नाच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. या चित्रपटाचा टीझर उद्या म्हणजेच ९ डिसेंबर रोजी सकाळी ११.०७ वाजता प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाच्या टीझर रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत. गीता आर्ट्स, मास मूव्ही मेकर्स, धीरज मोगिलिननी एंटरटेनमेंट हे 'द गर्लफ्रेंड'चे निर्माते आहेत. आता रश्मिका मंदान्ना तिच्या 'पुष्पा 2: द रुल'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले आहेत.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडाचं प्रेमप्रकरण : दरम्यान रश्मिकानं विजय देवरकोंडाबरोबर पुढील चित्रपट साइन केला आहे. या दोघांच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यायन करत असून याचे निर्माते मैथरी मूवी आहे. यापूर्वी दोघेही 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. दरम्यान रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पहिल्यांदा त्यांचा 'गीता गोविंदम' (2018) मध्ये एकत्र काम केल्यापासून सुरू आहेत. 'डियर कॉमरेड' (2019) साठी पुन्हा एकत्र आल्यानंतर त्याच्या डेटिंगचा अंदाज लावण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत दोघांना अनेकदा सुट्टीच्या दिवशी एकत्र पाहण्यात आलंय. रश्मिका आणि विजय नेहमीच चांगले मित्र असल्याचे सांगितात. या दोघांनी आपल्या नात्याबद्दल पुष्टी केलेली नाही. सध्या रश्मिका बॉलिवूड आणि साऊथमधील मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.
हेही वाचा :