मुंबई - Zero Se Restart : निर्माता दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी त्यांच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे नवा चित्रपट किंवा मालिका नाही तर त्यांचा अलिकडेच सुपरहिट ठरलेल्या '12 th फेल' चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ आहे. हा चित्रपट बनत असतानाचे पडद्या मागील प्रसंग यामधून प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येणार आहेत.
'झिरो से रीस्टार्ट' असे शीर्षक असलेला हा पडद्यामागील व्हिडिओ 19 जुलै रोजी रिलीज केला जाणार आहे. '12 th फेल' चित्रपटाच्या निर्मितीची एक रंजक गोष्ट यातून उलगडणार आहे.
'झिरो से रीस्टार्ट' या '12 th फेल'च्या मेकिंग व्हिडिओमध्ये या चित्रपटाची निर्मिती पूर्व गोष्टी ते चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊन, पोस्ट प्रॉडक्शन, प्रमोशन ते प्रीमियरपर्यंतच्या घडामोडींचे बीटीएस फुटेज यात पाहायला मिळेल. चित्रपट निर्मिती होत असताना निर्माण झालेले अडथळे आणि त्यावर केलेली मात, आव्हानांचा सामना करीत विजय मिळवण्याची गोष्टही यात उलडण्यात येणार आहे. या चित्रपटातील कलाकार विक्रांत मॅसी, मेधा शंकर, अनंत जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशू चॅटर्जी यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे '12 th फेल' चित्रपटाची कथा आकर्षक झाली आणि त्यांनी साकारलेल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले.
'झिरो से रीस्टार्ट' रिलीज होणार असल्याची घोषणा करत निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर केले आणि चाहत्यांना पुढे काय होणार आहे याची झलक दिली. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "विनोद चोप्रा फिल्म्स अभिमानाने झिरो से रीस्टार्ट सादर करत आहे: '12 th फेल' बनवण्यामागील अद्भूत प्रवास! या ब्लॉकबस्टर चित्रपटाने सर्व अडचणी कशा झुगारल्या याच्या पडद्यामागील अविश्वसनीय कथेचे साक्षीदार व्हा." असे म्हणत विधु विनोद चोप्रा यांचं ब्रीदवाक्य अधोरेखीत करण्यात आलंय.
'12 th फेल' हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आवडला आणि त्यांनी याची माऊथ पब्लिसिटी करायला सुरुवात केली. समीक्षकांनीही चित्रपटाचे खूप कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 66.55 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर डिस्ने प्लस हॉटस्टार प्रवाहित झाला आणि सर्वदूर पसरलेल्या प्रेक्षकांनीही चित्रपटाची खूप प्रशंसा केली. त्यामुळे 29 जुलै रोजी रिलीज होणार असलेल्या '12 th फेल' चित्रपटाचा 'झिरो से रीस्टार्ट' रिलीजची प्रतीक्षा आता करावी लागणार आहे.
हेही वाचा -
- "कोणाच्याही बापाची फिल्म इंडस्ट्री नाही", नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट उत्तर - Actress vidya balan
- दोन अभिनेत्रींबरोबर डेटिंग केल्याबद्दल अपराधी वाटत असल्याची कार्तिक आर्यननं दिली कबुली - Karthik Aaryan
- कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये मुख्य श्रेणीत 30 वर्षानंतर झळकणार भारतीय चित्रपट - CANNES FILM FESTIVAL