मुंबई - Vicky Kaushal hints new film: खेळकर मूडमध्ये असलेल्या विकी कौशलने सोमवारी अॅनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अॅमी विर्क यांच्या बरोबर काम करणार असल्याचे संकेत त्याने चाहत्यांना आपल्या इन्स्टाग्रामवर दिले आहेत. व्हिडिओमध्ये विकी कौशल आपल्या फॉलोअर्सना 'चांगली' आणि 'वाईट' बातमी यापैकी एकाची निवड करण्याचे आवाहन केले आणि काही तपशील शेअर केले. रिपोर्ट्सनुसार, करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये विकी, तृप्ती आणि अॅम्मी हे तिघे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
विकी आणि तृप्तीने यापूर्वी कधीही एका प्रोजेक्टवर एकत्र काम केलेले नाही. शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी करत आहेत आणि हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असेल. हा चित्रपट धर्मा प्रोडक्शन आणि लिओ मीडिया कलेक्टिव्ह अंतर्गत तयार करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात नेहा धुपिया हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
नेहाच्या सोशल मीडिया पोस्टनुसार विकी आणि तृप्ती हे पहिल्यांदा एकत्र येत असलेल्या चित्रपटाचे शीर्षक 'मेरे मेहबूब मेरे सनम' असे आहे. 'अॅनिमल'च्या यशानंतर तृप्ती विकीबरोबर या रोमकॉममध्ये दिसणार आहे. तिच्या 'अॅनिमल' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'शी टक्कर झाली होती. या चित्रपटात विकी बरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना ती म्हणाली की विकी खूप समजूतदार आहे आणि त्याच्या सहकलाकारांना तो त्यांचे हक्क देतो. तिने विकीच्या अभिनय क्षमतेचे खूप कौतुक केले होते.
तृप्तीला इतरांनी शिकवलेले आठवते की चांगले कलाकार केवळ त्यांच्या अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दृश्य चांगले होण्यावर विश्वास ठेवतात. 'मेरे मेहबूब मेरे सनम' हा चित्रपट विकी कौशल आणि आनंद तिवारी यांचा दुसरा एकत्रीत चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी 'लव्ह पर स्क्वेअर फूट' (2018) या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते.
हेही वाचा -