ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एपिसोडमध्ये विकी कौशल आणि सनी कौशलनं केली धमाल - Vicky Kaushal and Sunny Kaushal - VICKY KAUSHAL AND SUNNY KAUSHAL

The Great Indian Kapil Show : अभिनेता विक्की कौशल आणि सनी कौशल यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या चौथ्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या शोदरम्यान कपिल शर्मानं अनेक प्रश्न या कौशल ब्रदर्सला विचारले. आता या शोमध्ये विकीबद्दल एक खुलासा झाला आहे.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 12:15 PM IST

मुंबई The Great Indian Kapil Show : कॉमेडी किंग कपिल शर्माचा नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कपिलचा शो जगभरात लोकप्रिय होत आहे. या शोमध्ये अनेक कलाकार येऊन धमाल करतात. आत्तापर्यंत या शोचे 4 एपिसोड प्रदर्शित झाले आहेत. शनिवारी प्रदर्शित झालेला एपिसोड हा खूप धमाकेदार होता. दरम्यान चौथ्या एपिसोडमध्ये कौशल ब्रदर्सनं धमाल केली. या एपिसोडमध्ये दोन्ही भावांनी त्याच्याविषयी अनेक रंजक गोष्टींचा खुलासा केला. कपिलच्या शोमध्ये विकी कौशलची एक विचित्र सवयही समोर आली आहे. सनी कौशलनं या शोमध्ये त्याच्या लहानपणीच्या विचित्र सवयीचा खुलासा केला.

विकी कौशलच्या विचित्र सवयीचा झाला खुलासा : कपिल शर्मानं सनी कौशलला विचारलं की, "विकी कौशलची अशी काही विचित्र गोष्ट आहे का?" यानंतर त्यानं सांगितलं, "प्रत्येकाला झोपेत बोलायची सवय असते, पण विकी हा झोपेत बोलत पण होता आणि अभिनय देखील करत असे. कधी कधी तर मी कंफ्यूज होत होतो की हा खरच जागा आहे की झोपला आहे." यानंतर त्यानं पुढं सांगितलं, "एक दिवस मी झोपण्यासाठी जात होतो. विकी माझ्या 35-40 मिनिटे आधी झोपला होता. मी गेलो तेव्हा तो झोपेत बोलत होता. आम्ही दोघेही एकाच रुममध्ये झोपत होतो. यानंतर तो अचानक जागा झाला आणि ब्लँकेट काढले, यानंतर तो म्हणाला चेक कर... मला आश्चर्य वाटलं काय झालं. मग तो म्हणाला, माझा पेपर पूर्ण झाला आहे, हा चेक करा."

सनीनं दिलं विकीला उत्तर : यानंतर सनीनं सांगितलं, "त्यावेळी मला माहित होते की मी त्याच्याशी बोलले पाहिजे. मी पण सांगितलं की, तुझी कॉपी मी तपासली आहे. ती खूप चांगली आहे, तुला 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत. आता झोप." याशिवाय सनीनं विकीबद्दल आणखी एक गोष्ट सांगितलं की, "विकी गाणं खूप सुंदर गातो, त्याला चांगलं येत नसेल तरी तो खूप मनापासून गात असतो." यावर तिथे उपस्थित असणारे अनेकजण हसतात. दरम्यान विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर , तो आलिया भट्ट आणि रणबीर कपूरबरोबर 'लव्ह अँन्ड वॉर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय पुढं तो 'लुका चुप्पी 2', 'छावा', 'बॅड न्यूज', 'तख्त' या चित्रपटांमध्ये झळकेल.

हेही वाचा :

  1. नुकतंच लग्न झालेली आमिर खानची मुलगा आयरा वाटतेय एकटेपणाची भीती, इन्स्टावर पोस्ट करुन दिली भीतीची माहिती - Ira Khan
  2. अथिया शेट्टीनं आयपीएल 2024 सामन्यात सीएसके विरुद्ध केएल राहुलच्या स्मॅशिंग परफॉर्मन्सचे फोटो केले शेअर - ATHIYA SHETTY SHARE PIC
  3. पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात, पाहा व्हिडिओ - Pushkar Jog

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.