मुंबई - Sholay Gabbar Singh role : दिवंगत अभिनेता अमजद खाननं 'शोले'मधील गब्बर सिंगची भूमिका अक्षरशः अजरामर केली. 'शोले'मधील गब्बरचा प्रत्येक संवाद पुढे जाऊन हिट ठरला आणि त्याच्या प्रत्येक वाक्यानं प्रेक्षकांना भारावून टाकलं. अगदी सहज बोलून गेलेला संवाद होता, 'कितने आदमी थे?' तो देखील संस्मरणीय ठरला. शोलेतील गब्बर सिंगच्या तोंडी असलेले काही संवाद खाली देत आहोत, त्यावर एक नजर टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे प्रत्येक डायलॉग अमजद खान यांनी कसा अमर बनवला आहे.
- अरे ओ सांबा, कितना इनाम रखा है सरकार हम पर.
- इस पिस्तौल में तीन जिंदगी, तीन मौत बंद है, देखें किसे क्या मिलता है.
- छे गोली और आदमी तीन, बहोत ना इन्साफी है ये.
- यह दुश्मनी बहोत महेंगी पडेगी ठाकूर, बहोत मेहंगी.
- अरे ओ सांबा, ये रामगढ वाले अपनी बहू बेटीयों को कौन से चक्की का आटा खिलाते है रे? थारी के हात पांव तो देख बहोत करारे है साले
- यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा.
- तो अब गोली खा
- बहुत कटीली नचनिया है.
- गब्बर के ताप से तुम्हें एक ही आदमी बचा सकते है, खुद गब्बर.
- जो डर गया समझो मर गया.
- बहोत याराना लगता है.
- ये हात तुम हम को देदे ठाकूर.
- तेरा क्या होगा कालिया.
- होली कब है, कब है होली?
- जब तक तेरे पैर चलेंगे, उसकी साँस चलेगी. तेरे पैर रुके, तो बंदुक चलेगी.
'शोले' चित्रपट 15 ऑगस्ट 1975 ला रिलीज झाला होता. त्याला आता 49 वर्षे पूर्ण झाले असले तरी अमजद खानचे हे डायलॉग चित्रपटाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले आहेत आणि अद्यापही ताजे तवाने आहेत. रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनातील 'शोले'मधील गब्बर सिंगच्या भूमिकेनं हिंदी चित्रपटसृष्टीला सर्वात प्रतिष्ठित खलनायक बनवलं. मात्र, या भूमिकेसाठी तो मूळ पर्याय नव्हता.
दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'शोले'मधील गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी अगोदर अभिनेता डॅनी डेन्झोंगपा आणि रणजीत यांनाही संपर्क साधला होता. एएनआयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, रणजीत यांनी याबाबतच्या काही आठवणी सांगितल्या. ही भूमिका रणजीत यांच्याकडे आल्यानंतर डॅनी बरोबर असलेल्या मैत्रीचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी शोलेतील गब्बर सिंगची भूमिका नाकारली होती.
ज्येष्ठ अभिनेता रणजीत म्हणाले, "जेव्हा शोलेचे निर्माता माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, ही भूमिका डॅनी आता करणार नाही. त्याऐवजी ही भूमिका मी करावी अशी त्यांची इच्छा होती. खरं तर, या भूमिकेबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे डॅनीनं नकार दिला आहे हेही माहिती नव्हतं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, 'डॅनी माझा चांगला मित्र आहे... एकतर तुम्ही मला त्याच्याकडून ना हरकत पत्र आणा किंवा किमान त्याला माझ्याशी बोलू द्या, जर तो सहमत असेल तर मी चित्रपट करेन.' पण तो का येत नाही हे मला ठाऊक होते ( त्यावेळी डॅनी धर्मात्माच्या शूटिंगमध्ये बिझी झाले होते.) आणि मी चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला,” असं रणजीत यांनी सांगितलं.
"ही भूमिका अमजद खानच्या नशिबात होती...हो सकता है मैं गब्बर करता तो शायद दर्शकों को नहीं अच्छा लगता," असंही रणजीत म्हणाले. रणजीत आणि डॅनी यांची आजवर अतिशय चांगली मैत्री आहे. दोघेही हिंदी चित्रपटसृष्टील महान खलनायक म्हणून यशस्वी झाले आहेत. रणजीत आपल्या डॅनी बरोबरच्या मैत्रीतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असतात.
रणजीत यांनी 2022 मध्ये शेअर केलेल्या एका व्हिडिओत रणजीत त्याच्या मुलांना आणि तरुण पिढीला सल्ला देताना दिसत आहेत. या व्हिडिओत रणजीत बरोबर डॅनी आणि अकबर खान दिसत आहेत. यात डॅनी यांनी रणजीतला विचारलं की तो नवीन मुलांना काय सांगू इच्छितो. रणजीत यांनी उत्तर दिलं, "मी तुझा मित्र आहे. तुला तुझं जीवन माहित आहे आणि तुला त्यातून काय हवं आहे हेही तुला माहिती आहे. तू स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतोस अशा पद्धतीनं तू वाढवलं आहेस." यानंतर डॅनी यांनी रणजीत यांना शहाणा म्हणून चिडवताना दिसतात. रणजीत आणि डॅनी यांनी त्यांच्या खलनायकी अभिनयानं त्यांच्या काळात चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं होतं.
हेही वाचा -
- 'जोकर 2'च्या ट्रेलर रिलीजची प्रतीक्षा संपली, जोक्विन आणि लेडी गागाचे नवीन पोस्टर जारी - Joker 2 sequel
- भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या जोडप्यानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट - Bharti Singh sons birthday
- भाऊ कदम आणि ओंकार भोजनेच्या जोडगोळीसह निलेश साबळे पुन्हा 'हसवणुकी'साठी सज्ज - Nilesh Sable Comedy Show