ETV Bharat / entertainment

'वीर मुरारबाजी' मराठी चित्रपट होईल 'या' दिवशी प्रदर्शित, जाणून घ्या तारीख - Veer Murarbaji - VEER MURARBAJI

Veer Murarbaji Marathi Movie : 'वीर मुरारबाजी' हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. 'रणझुंजार' मुरारबाजी देशपांडेची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात हिंदी मालिकांमधला लोकप्रिय अभिनेता सौरभ राज जैन छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

Veer Murarbaji Marathi Movie
वीर मुरारबाजी मराठी चित्रपट (instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 28, 2024, 3:06 PM IST

मुंबई - Veer Murarbaji Marathi Movie : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला आहे. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत अतुल पराक्रम गाजवला होता. स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात 'पुरंदरचे काळभैरव' म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा 14 फेब्रुवारी 2025ला 'वीर मुरारबाजी' या चित्रपटातून येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये रिलीज होईल.

'वीर मुरारबाजी'बद्दल केल्या व्यक्त भावना : मालिकाविश्वात लोकप्रिय असणारा अभिनेता सौरभ राज जैननं 'वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा'मध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं सुरेख पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. 'फत्तेशिकस्त'आणि 'पावनखिंड' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी 'वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा' चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिरूद्ध आरेकर, अजय आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. दरम्यान या चित्रपटातल्या स्वतःच्या व्यक्तिरेखेबद्दल सौरभ राज जैन कमालीचा उत्साही आहे. "सगळ्या देवतांच्या भूमिका, तसेच आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मिळणे, हे मी भाग्यच समजतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या आजवरच्या पौराणिक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. आपलं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं हेच प्रेम देईल, ही आशा आहे." या शब्दांत सौरभने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुरारबाजी देशपांडे यांच्याबद्दल : 1665 च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे अवघ्या सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. त्यांनी 'न भूतो न भविष्यती' असा पराक्रम गाजवला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमानं मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी, या उद्देशाने 'वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा' हा चित्रपट घेऊन येत असल्याची माहिती निर्माते अजय आरेकर यांनी दिली आहे. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे, त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील यावेळी निर्मात्यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.