मुंबई - Diljit Dosanjh : गायक दिलजीत दोसांझ हा त्याच्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमुळे सध्या चर्चेत आहे. 13 एप्रिल रोजी मुंबईत एक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. आता या कॉन्सर्टमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिलजीत दोसांझनं या कॉन्सर्टमध्ये आपल्या सुंदर आवाजानं लोकांना डान्स करण्यास भाग पाडले होते. मुंबईत त्याचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी करोडो चाहते स्टेडियमवर पोहोचले होते. म्युझिकल नाईटमध्ये बी-टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान वरुण धवन आणि क्रिती सेनॉन या कॉन्सर्टमध्ये खूप धमाल केली. या दोन्ही कलाकारांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये मुनवर फारुकी आणि अवनीत कौरही दिसले.
दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट : याशिवाय या कॉन्सर्टमध्ये बी-टाऊनच्या क्यूट कपल्सपैकी एक, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा देखील हजर होते. या कॉन्सर्टदरम्यान दोघेही हातात हात घालून जाताना दिसले. या जोडप्यानं पापाराझींसाठी पोझही दिली. मनीष पॉल, विकी कौशल, करण कुंद्रा, अंगद बेदी यांच्यासह अनेक कलाकारांनी या कॉन्सर्टचा आनंद घेतला होता. 'क्रू' चित्रपटाच्या यशानंतर दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये पोहचलेली क्रिती सेनॉन तिच्या स्टाईलिश अंदाजात दिसली. काळ्या टी-शर्टमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. क्रिती तिची बहीण नुपूर सेनॉनबरोबर होती. याशिवाय सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वरुण धवन क्रितीचा हात धरून आहे.
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये क्रिकेटर्सनं लावली हजेरी : दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सच नाही तर काही क्रिकेटर्स आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील हजेरी लावली होती, यामध्ये जसप्रीत भुमराह त्याची पत्नी संजनाबरोबर दिसला होता. याशिवाय सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली या कार्यक्रमात स्पॉट झाली. यावेळी दिलजीत दोसांझनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि सर्वांचे मनोरंजन केले. दिलजीत हा सध्या 'अमर सिंह चमकीला' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामधील त्याचा अभिनय अनेकांना आवडला आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा दिसली आहे.
हेही वाचा :
- घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला फोन कॉल, सुरक्षेबाबत दिली मोठी माहिती - Salman Khan
- सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
- अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan