मुंबई : अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. दरम्यान, वरुण धवन अभिनीत ' बेबी जॉन' हा चित्रपट देखील सध्या खूप चर्चेत आहे. 'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर दाखल होण्यासाठी सज्ज आहे. आता अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख उघड करताना, निर्मात्यांनी सांगितलं की, 'बेबी जॉन'चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा 9 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटलीनं सोशल मीडियावर एक नवीन पोस्टर रिलीज केलंय.
'बेबी जॉन'चा ट्रेलर : यामध्ये ट्रेलरची तारीख उघड करण्यात आली आहे. दरम्यान रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये वरुण हा गंभीर असल्याचा दिसत आहे. अॅटलीनं पोस्टर शेअर करताना या पोस्टमध्ये लिहिलं, 'काउंटडाउन सुरू झालं आहे, 'बेबी जॉन'ची ॲक्शन पाहण्यासाठी सज्ज व्हा, उद्या ट्रेलर रिलीज होणार आहे. 'बेबी जॉन' 25 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.' याआधी 'बेबी जॉन'चा रिलीज झालेला टीझर हा प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटामध्ये वरुण धवन हा अधिकाऱ्याच्या भूमिकेत ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
'बेबी जॉन' चित्रपटाची स्टारकास्ट : 'बेबी जॉन' चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये कीर्ती सुरेशची झलक दाखविण्यात आली आहे. 'बेबी जॉन' चित्रपटामधून किर्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'बेबी जॉन' हा ॲटलीच्या 'थेरी' चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये थलपथी विजय आणि सामंथा रूथ प्रभु हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसले होते. 'बेबी जॉन'चं लेखन आणि दिग्दर्शन कलिश यांनी केलंय. या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. 'बेबी जॉन'मध्ये वरुणचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान वरुणच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'बॉर्डर 2' 'एक्कीस'मध्ये झळकणार आहे.
हेही वाचा :