ETV Bharat / entertainment

वरुण धवनने शेअर केला 'बेबी जॉन' सेटवरील फोटो, शूटिंगचा '७० वा दिवस' असल्याचा केला खुलासा - Varun Dhawan next movie - VARUN DHAWAN NEXT MOVIE

Varun Dhawan next movie : वरुण धवनने त्याच्या आगामी 'बेबी जॉन' चित्रपटच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवर त्याचा ७० वा दिवस असल्याचा खुलासा त्यानं यात केला आहे. हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट यावर्षी 31 मे रोजी रिलीज होणार आहे.

Varun Dhawan next movie
वरुण धवनने शेअर केला 'बेबी जॉन' सेटवरील फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 7:09 PM IST

मुंबई - Varun Dhawan next movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी अ‍ॅक्शन पॅक थ्रिलर 'बेबी जॉन'चित्रपटच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मंगळवारी त्यानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटाच्या सेटची एक झलक शेअर केली. चित्रपटाच्या सेटवर त्याचा ७० वा दिवस असल्याचा खुलासा त्यानं या पोस्टमधून केला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीतून वरुणनं चित्रपटाच्या सेटवरून "दिवस 70" असे ठळक लिहून एक क्लिप पोस्ट केली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली दिसत आहे, त्याची पाठ कॅमेऱ्याकडे आहे. काळ्या रंगाच्या हुडीमध्ये असलेला वरुण दिसत असताना त्याच्या पाठीवर चित्रपटाचे शीर्षक "बेबी जॉन" असं लिहिल्याचं दिसतं.

Varun Dhawan next movie
वरुण धवनने शेअर केला 'बेबी जॉन' सेटवरील फोटो

ए कालीश्वरन दिग्दर्शित 'बेबी जॉन' हा चित्रपट अ‍ॅटली जिओ स्टुडिओ आणि सिने१ स्टुडिओच्या सहकार्याने सादर करत आहेत. चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. त्याला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कीर्ती सुरेश, जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी आणि राजपाल यादव हे देखील 'बेबी जॉन'च्या कलाकारांचा भाग आहेत. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी, प्रिया ऍटली आणि ज्योती देशपांडे करत आहेत.

येत्या काही महिन्यांत, वरुण धवन लोकप्रिय हॉलिवूड मालिका 'सिटाडेल'च्या भारतीय रूपांतरामध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या बरोबर भूमिका साकारणार आहे. हे भारतीय रूपांतर रुसो ब्रदर्सच्या त्याच शीर्षकाच्या मालिकेवर आधारित आहे. हॉलिवूड आवृत्तीसाठी प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन प्रमुख भूमिकेत होते. राज आणि डीके वरुण धवन स्टारर चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या 'सिटाडेल'च्या भारतीय आवृत्तीची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

हेही वाचा -

  1. सलमान आणि अर्जुन कपूरचे संबंध ताणल्याची बोनी कपूरनं दिली कबुली - Boney Kapoor
  2. गरोदर असल्याच्या बातमीची परिणीतीनं काढून टाकली हवा, मिश्कील पोस्टसह केलं खंडण
  3. प्रियांका चोप्रासह निक जोनास लॉस एंजेलिसला परतले, फोटो केले शेअर - Nick and Priyanka

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.