मुंबई - Citadel: Honey Bunny : सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन हे आगामी सिटाडेल इंडिया या बहुचर्चित वेब सिरीजमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच, मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान प्राइम व्हिडिओने मालिकेचे शीर्षक उघड केले आणि त्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेला हा शो सिटाडेल या अमेरिकन मालिकेवर आधारित आहे. मूळ अमेरिकन मालिकेमध्ये प्रियांकाचा चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती.
'सिटाडेल : हनी बनी' असे भारतीय रुपांतर असलेल्या या मालिकेचे कथानक 90 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवरचे आहे. हा एक हृदयस्पर्शी प्रेमकथा असलेल्या रोमांचकारी गुप्तहेराच्या साहसी कथांचे मिश्रण असलेले अनोखे कथानक आहे. हनी बनी ही मोठ्या सिटाडेल विश्वातील मालिका आहे. स्ट्रीमिंग जायंट अमेझॉन प्राईमने अद्याप 'सिटाडेल: हनी बनी'च्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.
सामंथा आणि वरुण यांच्याबरोबरीने के के मेनन, सिमरन, सोहम मजुमदार, शिवंकित परिहार, काशवी मजमंदर, साकिब सलीम आणि सिकंदर खेर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही मालिका राज, डीके आणि सीता मेनन यांनी सह-लेखन केली असून यांनीच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास अभिनीत मूळ अमेरिकन मालिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना ही मालिका आवडली असली तरी निर्मात्यांच्या आणखी जास्त अपेक्षा होत्या. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये त्याच्या सर्जनशील कामाची मोठी ओळख असलेल्या रुसो ब्रदर्शनी या मालिकेसाठी तब्बल 250 दशलक्ष इतका मोठा खर्च केला होता.
वरुण धवनने सांगितले की मालिकेतील त्याच्या भूमिकेच्या तयारीसाठी त्याने सखोल प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी त्याने हाँगकाँग आणि लॉस एंजेलिसमधील स्टंट आणि अॅक्शन कोऑर्डिनेटर्सची मदत घेतली होती. हाताने फाईट करण्यासह, शस्त्रास्त्र कौशल्ये आणि एकंदर तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला माणि मदत घेतली होती.
हेही वाचा -