ETV Bharat / entertainment

उर्फी जावेदनं घातला 100 किलो वजनाचा गाऊन, व्हिडिओ व्हायरल - urfi jawed wearing 100 kg gown - URFI JAWED WEARING 100 KG GOWN

Urfi Jawed : उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिनं 100 किलोचा गाऊन घातला आहे.

Urfi Jawed
उर्फी जावेद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 5:45 PM IST

मुंबई - Urfi Jawed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. उर्फी असे पोशाख डिझाइन करत असते, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हे पोशाख ती तिच्या चाहत्यांना घालून देखील दाखवत असते. उर्फी खूप क्रिएटिव्ह आहे हे तिच्या पोशाखांमध्ये दिसून येते. दरम्यान पुन्हा एकदा उर्फी तिच्या विचित्र पोशाखामुळे चर्चेत आली आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये उर्फी एका सुंदर पोशाखात दिसत आहे. आता यावेळी उर्फीनं एक जड गाऊन डिझाइन केला आहे. हा गाऊन परिधान करून ती रस्त्यावर उतरली आहे.

उर्फीचा नवीन पोशाख : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत उर्फी हेवी ब्लू कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. हा गाऊन इतका मोठा आणि जड आहे की तो हाताळण्यासाठी 4 लोकांची गरज तिला पडत आहे. हा इतका मोठा आहे की, तिला कारऐवजी टेम्पोमध्ये बसून यावं लागलं आहे. व्हिडिओमध्ये ती टेम्पोमधून बाहेर पडताना दिसत आहे. हा तिचा गाऊन 100 किलो वजनाचा असल्याचं तिनं सांगितलं आहे. याशिवाय तिनं या आऊटफिटसाठी पोलिसांकडून परवानगी घेतली असल्याचं देखील व्हिडिओत म्हटलं. आता उर्फीच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. काहीजण तिला सुंदर दिसत असल्याचं म्हणत आहे.

युजर्सनी केलं उर्फीचं कौतुक : एका युजरनं कमेंट करत लिहिलं, "उर्फीचा ड्रेस कोण डिझाईन करतो?" दुसऱ्या एका युजरनं लिहिलं , "यावेळी उर्फीनं ड्रेस चांगला परिधान केला आहे. आणखी एकानं यूजरनं लिहिलं, "उर्फीच्या मनातील कल्पना कधीच संपत नाहीत. ती दररोज आश्चर्यचकित गोष्टी करत असते." याशिवाय काहीजणांनी या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केरत आहेत. दरम्यान उर्फीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर स्प्लिट्सविला 15मध्ये दिसली होती. ती सनी लिओनीबरोबर को-होस्ट बनली होती. याशिवाय ती 'लव सेक्स और धोखा 2 'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलीफिल्म्स प्रोडक्शन करत आहे.

हेही वाचा :

  1. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला कॉल, अतिरिक्त सुरक्षा पुरवणार - Salman Khan
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' निर्मात्यांनी मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याच्या खोट्या दाव्यांचं केलं खंडन - Bade Miyan Chote Miyan
  3. रिहाना ते लिली ग्लॅडस्टोन मेट गाला 2024च्या कार्यक्रमात लावणार हजेरी - Met Gala 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.