ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूर कपूरचा अनोखा अवतार, 'उलझ' अ‍ॅक्शन पॅक्ड टीझर रिलीज - Janhvi Kapoor - JANHVI KAPOOR

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर अभिनीत 'उलझ'च्या निर्मात्यांनी बुधवारी चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 1:17 PM IST

मुंबई - Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची भूमिका असलेल्या आगामी 'उलझ' चित्रपटाचा टीझर बुधवारी प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुधांशू सारिया दिग्दर्शित या देशभक्तीपर थ्रिलरमध्ये जान्हवीबरोबर गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट एका सुप्रसिद्ध देशभक्त कुटुंबातील एका तरुण राजदूताभोवती केंद्रीत झाला आहे. अनेक रहस्यमय गोष्टी यातून उगडल्या जाणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

जान्हवी कपूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा टीझर शेअर करताना लिहिलंय: "लबाड, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा. 'उलझ' 5 जुलै रोजी सिनेमागृहात." टीझर आपल्याला IFS (इंडियन फॉरेन सर्व्हिसेस) च्या मनोरंजक जगाच्या प्रवासावर घेऊन जातो. जान्हवीनं टीझर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी आणि फिल्म इंडस्ट्रीतील शुभचिंतकांनी तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यामध्ये जान्हवी साकार करत असलेल्या सुहाना या व्यक्तीरेखेचा या मोहिमेतील हेतू सांगतानाच्या व्हाइस ओव्हरसह टीझरला सुरुवात होते, तेव्हापासून प्रेक्षकांचं लक्ष तिच्यावर खिळून राहते. तिच्याबाबतीत अनेक थ्रिलर गोष्टी घडताना यामध्ये दिसतात. हा एक वेगळ्या शैलीमध्ये सेट केलेला चित्रपट एका अनोख्या विश्वाचं दर्शन घडवणारा आहे.

'उलझ' या चित्रपटातून आपल्या देशाप्रती विश्वासघात आणि निष्ठा या जगाशी लवकरच आपली ओळख करून दिली जाईल, अशा नोकरीमध्ये सीमा कशा पुसट केल्या जातात यावरही चित्रपट प्रकाश टाकतो. विश्वासघाताची किंमत जीवन आहे असे सांगणारे जान्हवीचा विश्वासघाताबद्दलचा दमदार संवाद या टीझरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.

'उलझ' या चित्रपटात जान्हवी कपूर एका अनोख्या अ‍ॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. चारी बाजून घेरल्यानंतरही यातून जान्हवी कशा प्रकारचा संघर्ष करणार हे पाहणे मनोरंजक आहे. हा चित्रपट परवीज शेख यांनी लिहिला आहे आणि जंगली पिक्चर्सच्या सुधांशू सारियाने बनवला आहे.

हेही वाचा -

विद्या बालननं सांगितला 'दो और दो पांच'च्या शीर्षकाचा किस्सा, फुल्ल टू धमाल कॉमेडी करायची व्यक्त केली इच्छा! - Vidya Balan interview

शिल्पा शेट्टीनं अष्टमी नवरात्रीला मुलगी समिशाबरोबर केलं कन्यापूजन , व्हिडिओ व्हायरल - Shilpa Shetty

दीपिका पदुकोणला गरोदरपणामध्ये 'हा छंद जीवाला लावी पिसे' !! - deepika padukone

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.