ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी गोंडस मांजरीचं केलं स्वागत, व्हिडिओ व्हायरल - vicky jain - VICKY JAIN

Ankita lokhande : अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या घरी एका गोंडस मांजरीचं आगमन झालं आहे. अंकितानं सोशल मीडिया पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे.

Ankita lokhande
अंकिता लोखंडे (instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 1, 2024, 5:27 PM IST

मुंबई - Ankita lokhande : टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी एक छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप झपाट्यानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या छोट्या पाहुण्याची झलक दाखविण्यात आली आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना देखील आवडला आहे. बी-टाउनमध्ये अनेक सेलिब्रिटींना मांजर आणि श्वानचं वेड आहे. अनेक सेलिब्रिटींकडे हे प्राणी आहेत. वरुण धवन, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट आणि कपिल शर्मा यांच्याकडे हे पेट्स आहेत. आता अंकिता लोखंडे देखील कॅट मॉम बनली आहे.

अंकिता लोखंडेनं केला क्यूट मांजरीचा व्हिडिओ शेअर : अंकितानं आपल्या घरात एका मांजरीचे स्वागत केलं आहे. तिनं आपल्या सोशल इंस्टाग्राम पेजवर एका छोट्या मांजरीचा व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. क्लिपची सुरुवातीला अंकिताचा पती विकी जैन हा लिफ्टच्या बाहेर त्याच्या मांजरीची वाट पाहत असून तो हा क्षण त्याच्या फोनवर कॅप्चर करत आहे. यानंतर अंकिता ही टोपलीतून गोंडस मांजरीला बाहेर काढते. यानंतर दोघेही या मांजरीचा लाड करतात. अंकितानं या व्हिडिओत तिच्या गोंडस मांजरीबरोबर सुंदर क्षण दाखविले आहेत. अंकितानं आपल्या मांजरीचे नाव मौ लोखंडे जैन असं ठेवलं आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया : हा व्हिडीओ शेअर करताना अंकितानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "कुटुंबात तुमचे स्वागत आहे, आमची छोटी राजकुमारी. मौ लोखंडे जैन! तुम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्य आहात. आई आणि बाबा तुमच्यावर आधीच खूप प्रेम करतात. तुमचे छोटे पंजे आमच्या आयुष्यात अपार आनंद घेऊन येत आहे. तुमचे जीवन हास्यानं आणि कधीही न संपणाऱ्या आनंदानं भरले जावो, तुमच्या गोड कृतींबद्दल धन्यवाद." या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, "किती गोड मांजर आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "अंकिता मांजरवर खूप प्रेम करत आहे." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "आता एक डॉग पण घरी आणा." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल, यूजर्सनं केलं ट्रोल - Anikita Lokhande News
  2. अंकिता लोखंडे 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये दिसणार, निर्मात्यांनी केलं पोस्टर शेअर - ANKITA LOKHANDE
  3. अंकिता लोखंडे आणि विकी जैन स्टारर म्युझिक अल्बम 'ला पिला दे शराब' फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - ankita lokhande and vicky jain

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.