ETV Bharat / entertainment

महिला प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार टायगर श्रॉफ - कार्तिक आर्यन

TATAWPL 2024 Opening Ceremony : महिला प्रीमियर लीग 2024 चा उद्घाटन सोहळा 23 फेब्रुवारी रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे पार पडत आहे. 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घान सोहळ्यात टायगर श्रॉफ परफॉर्म करताना दिसणार आहे. टायगर व्यतिरिक्त या कार्यक्रमात कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील परफॉर्मन्स सादर करणार आहे

Tiger Shroff
टायगर श्रॉफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 1:39 PM IST

मुंबई - TATAWPL 2024 Opening Ceremony : अभिनेता टायगर श्रॉफ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे पार पडणाऱ्या महिला प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाला आहे. डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन सोहळा हा चमकत्या तारेतारकांच्या सादरीकरणाचा असेल. मंगळवारी, WPL च्या सोशल मीडिया टीमने शेअर केले की टायगर श्रॉफ भव्य स्टार-स्टडेड इव्हेंटमध्ये परफॉर्म करणार आहे.

"ये किंगडम नहीं, अब क्वीनडम है! टायगर श्रॉफ त्याच्या क्वीनडम मुकुटासाठी लढत असताना सहभागी व्हा! जिओ सिनेमावर टाटा डब्ल्यूपीएल 2024 उद्घाटन सोहळा एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू वरून LIVE पाहा," असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

या खास अपडेटमुळे टायगर श्रॉफचे चाहते कमालीचे उत्साहित झाले आहेत. अनेकजणांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त केला आहे. टायगर व्यतिरिक्त या कार्यक्रमात कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सारखे कलाकार देखील परफॉर्म करताना दिसणार आहेत.

डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात २३ फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये गेल्या वर्षीचा अंतिम फेरीतील विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे सलामीच्या सामन्यात स्पर्धा होईल. ही स्पर्धा १७ मार्चपर्यंत चालणार असून बेंगळुरू आणि दिल्ली येथे स्पर्धेचे सामने होणार आहेत. 17 मार्च रोजी नवी दिल्ली येथे अंतिम सामना होणार आहे तर एलिमिनेटर 15 मार्च रोजी खेळवला जाईल. आगामी स्पर्धेचे आयोजन दिल्ली आणि बेंगळुरू येथील मैदानावर करतील. सर्व सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील.

यावेळी, दोन महत्त्वाच्या शहरात पार पडणारी ही स्पर्धा संपूर्ण भारतातील चाहत्यांसाठी क्रिकेट फीव्हरचा दुहेरी डोस मिळेल. यंदाच्या स्पर्धेमध्ये यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे पाच संघ प्रतिष्ठित ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यासाठी झुंज देतील.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये WPL 2024 लिलाव संपल्यानंतर संघांनी आधीच त्यांच्या संघांसाठी खेळाडूंची निवड केली आहे. डब्ल्यूपीएलचा 2024 चा सीझन मागील वर्षाच्या रचनेप्रमाणेच असेल, लीग टप्प्यातील शीर्ष तीन बाजू प्लेऑफसाठी पात्र ठरतील. लीग क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा संघ आपोआप अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणारे संघ १५ मार्च रोजी एलिमिनेटरमध्ये भाग घेतील.

गेल्या वर्षी, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव करून उद्घाटनाच्या मोसमात विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा -

  1. विद्या बालनच्या नावे बनावट इन्स्टा अकाऊंट बनवून फसवणूक; गुन्हा दाखल
  2. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये शाहरुखने मारली बाजी
  3. विराट-अनुष्काला पुत्ररत्न, मुलाचं ठेवलं 'हे' अनोखं नाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.