मुंबई - प्रभास आणि पृथ्वीराज यांची भूमिका असलेला 'सालार: भाग 1 - सीझफायर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाच्या तेलुगू, तमिळसह दाक्षिणात्य भाषेतील चित्रपट ओटीटीलर रिलीज झालाय. मात्र हिंदी चित्रपट प्रसारित न झाल्याने देशभरातील चाहते त्याची वाट पाहात होते. अखेर सालारच्या ओटीटीवरील हिंदी आवृत्तीच्या प्रतीक्षा आता संपणार आहे.
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारवरने इन्स्टाग्रावर चाहत्यांना ही बातमी दिली आणि त्याला कॅप्शन दिले, "तुमने बुलाया और सालार चला आया. सालार 16 फेब्रुवारी पासून Disney+ Hotstar वर स्ट्रीमिंग होणार." या बातमीमुळे प्रभास आणि पृथ्वीराजच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. विशेषतः दाक्षिणेतील राज्या बाहेर असलेल्या तमाम हिंदी भाषिक प्रेक्षकांना आणि प्रभासच्या चाहत्यांना याची खूप प्रतीक्षा लागून राहिली होती. ओटीटीवरील या चित्रपटाच्या प्रसारणामुळे प्रभासचा चाहता वर्ग आणखी विस्तारु शकतो.
ओटीटीवर चित्रपट स्ट्रिमिंग होणार असल्याबद्दलचा आपला उत्साह शेअर करताना, प्रभास म्हणाला, "सालार: भाग 1 - सीझफायरच्या यशाचे वर्ष साजरे करताना मी खूप रोमांचित आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रवास आमच्यासाठी अविश्वसनीय आणि भावनिक रोलरकोस्टर आहे. आता चित्रपट येत आहे. डिस्ने प्लस हॉट स्टारवरील हिंदीतील या कथेचे साक्षीदार होण्यासाठी मी जगभरातील प्रेक्षकांना फार काळ वाट पाहायला लावू शकत नाही. उत्तर आणि मध्य भारतातील माझे चाहते ओटीटीवर सालार हिंदीमध्ये कधी येणार हे जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर तुफान गर्दी करत आहेत."
दिग्दर्शक-लेखक प्रशांत नील म्हणाले, "मी नेहमीच पॉवर-पॅक अॅक्शन आणि प्रभावशाली संगीताने भरलेल्या विद्रोहाच्या कथांचा चाहता आहे. सालारमध्ये मी एक अशी कथा तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते जिथे प्रत्येक नायक एक प्रकारे खलनायक देखील असतो. तुम्हाला वरद राजनची धडपड असेल किंवा देवाचा पराक्रम असो, दोघेही आपापल्या लढाईने भारावलेले आहेत. हेच माझ्यासाठी सालारला वेगळे बनवते. आता सालार चित्रपट हिंदीमध्ये ओटीटीवर येत आहे."
हेही वाचा -