नवी दिल्ली - 'रामायण' या बहुप्रतीक्षित चित्रपट बनत असल्याची अधिकृत घोषणा निर्माते नितेश तिवारी यांनी केली आहे. नमित मल्होत्रा निर्मित या महाकाव्य गाथा असलेल्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर भगवान रामच्या भूमिकेत दिसणार आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. यामध्ये साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि केजीएफ फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2026 मध्ये रिलीज होणार आहे आणि दुसरा भाग 2027 मध्ये रिलीज होणार आहे.
नमित मल्होत्रा यांनी यापूर्वी 'डून' आणि 'इनसेप्शन' यासह अनेक हाय-प्रोफाइल हॉलीवूड प्रकल्पांवर काम केलं आहे, त्यांनी या चित्रपटाबद्दलचा आपला उत्साह एक्सवर शेअर केला आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसह दिलेल्या संदेशात त्यांनी लिहिलंय की, "एक दशकाहून अधिक काळापूर्वी, मी 5000 वर्षांपासून जगातील अब्जावधी हृदयांवर राज्य करणाऱ्या या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठीच्या एका उदात्त प्रयत्नाला सुरुवात केली. आपला इतिहास, आपले सत्य आणि आपली संस्कृती असलेलं आमच "रामायण" जगभरातील लोकांसाठी सर्वात अस्सल, पवित्र आणि नेत्रदीपक दृश्यांसह जगभरातील लोकांसमोर सादर करण्यासाठी कटिबद्ध होतो. आमची संपूर्ण टीम केवळ एकाच उद्देशाने अथक परिश्रम करत असताना ते सुंदर आकार घेत असल्याचे पाहून रोमांचित झालो आहोत."
More than a decade ago, I embarked on a noble quest to bring this epic that has ruled billions of hearts for over 5000 years to the big screen. pic.twitter.com/Hf7MblEf41
— Namit Malhotra (@malhotra_namit) November 6, 2024
नमित मल्होत्रा यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर प्राचीन भारतीय महाकाव्याच्या सामर्थ्याचे आणि भव्यतेचे प्रतीक असलेल्या अग्निमय बाणाची आकर्षक प्रतिमा दिसत आहे. नमित मल्होत्रा पुढे म्हटलंय की, "आमच्या महाकाव्य 'रामायणा'ची गाथा पडद्यावर आणण्याचे स्वप्न पूर्ण करत असताना आमच्यात सामील व्हा... दिवाळी 2026 मध्ये भाग 1 आणि दिवाळी 2027 मध्ये भाग 2. आमच्या संपूर्ण रामायण कुटुंबाकडून."
'दंगल' आणि 'छिछोरे' या चित्रपटासाठी ओळखले जाणारे निर्माता आणि दिग्दर्शक नितेश तिवारी या दोन भागांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचे दोन्ही भाग दिवाळीच्या सणाच्या दरम्यान प्रदर्शित केले जातील. 'रामायणा'चा पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा भाग 2027 ला दिवाळीमध्ये रिलीज होईल.