ETV Bharat / entertainment

इतिहासातलं सुवर्णपान रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी येत आहे 'भूपती', मोशन पोस्टर लॉन्च - motion poster of Bhupathi - MOTION POSTER OF BHUPATHI

Motion poster of Bhupathi : भविष्याचा वेध घेण्यासाठी भूतकाळाचा इतिहास समजून घेणं अपरिहार्य ठरतं. याच विषयावरील एक चित्रपट 'भूपती' प्रदर्शित होणार आहे. दिनेश जगताप दिग्दर्शित 'भूपती' चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे.

poster of Bhupathi
'भूपती' पोस्टर लॉन्च (poster of Bhupathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 5:27 PM IST

मुंबई - Motion poster of Bhupathi : इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच असते. पुस्तकातून, ऐकिव आख्यायिका, कागदपत्र इत्यादीमधून मग तो जगाचा, देशाचा, प्रदेशाचा किंवा एखाद्या राजघराण्याचा इतिहास का असेना..! असं म्हणतात की, 'उद्या'साठी तुम्हाला 'काल' माहिती असणं फार गरजेचं आहे. रंजकता असेल तर मनापासून ऐकलेल्या त्या ऐतिहसिक गोष्टी कायम आपल्या स्मरणात राहतात. तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण भूतकाळात जाऊन संशोधन करतोय म्हणूनच शेकडो, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आजकाल आपल्याला समजतोय. खरंतर खूप मागं जाऊन हे संशोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक महत्त्वाचा प्रयत्न दिनिशा फिल्म्स प्रा.लि. यांच्या आगामी 'भूपती' या मराठी चित्रपटातून होणार आहे.

motion poster of Bhupathi
'भूपती', मोशन पोस्टर लॉन्च (poster of Bhupathi)

नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली असून त्याचं आकर्षक पोस्टर आणि मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन दिनेश जगताप करीत असून निर्मिती यशराज जगताप यांची आहे. छायांकन मंगेश गाडेकर करणार आहेत. ‘हजारॊ वर्षांपासूनच या घनदाट जंगलातलं त्यांचं राज्य देवभूमी... जेव्हा जेव्हा शत्रूंनी चाल केली तेव्हा तेव्हा त्यांना यमसदनी धाडलंय… तोच पुन्हा येतोय..! असा भारदस्त आवाज आणि ऐतिहासिक वास्तूमधील एक दिव्यमूर्ती ‘भूपती’च्या मोशन पोस्टरमध्ये पहायला मिळतं आहे.

इतिहासातील एक सुंदर गोष्ट जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच मनोरंजन व सामाजिक प्रबोधन ‘भूपती’ या चित्रपटातून होईल याची मला खात्री आहे, असं दिग्दर्शक दिनेश जगताप म्हणाले. जगाच्या पाठीवर सर्वप्रथम जी वास्तू निर्माण झाली व पुढे त्याच्यासारख्या अनेक वास्तू निर्माण करून त्यांच्या मदतीनेच आपल्या पूर्वजांनी जो दैदीप्यमान इतिहास घडविला, त्यातलंच एक सुवर्णपान म्हणजे ‘भूपती’. २०२५ मध्ये ‘भूपती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे

हेही वाचा -

शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार 'बंजारा' चित्रपट - movie Banjara

'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरूवात, पाहा कमाई - kalki 2898 ad box office day 1

अक्षय कुमार आणि राधिका मदन स्टारर आगामी चित्रपट 'सरफिरा'मधील दुसरं गाणं रिलीज - AKSHAY KUMAR AND RADHIKA MADAN

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.