ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज, रॅपर बादशाह करणार 'सनसनाटी' खुलासा - The great indian kapil show - THE GREAT INDIAN KAPIL SHOW

The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल' शोचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यावेळी या शोमध्ये रॅपर बादशाह, डिव्हाईन आणि करण औजला हे येणार आहेत.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल (कपिल शर्मा (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 3:01 PM IST

मुंबई - The Great Indian Kapil Show : कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या नवीन कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल'मुळे सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या या शोच्या पुढील एपिसोडमध्ये प्रसिद्ध रॅपर बादशाह, करण औजला आणि डिव्हाईन दिसणार आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो आज 12 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये कपिल रॅपर युनियनबरोबर खूप मस्ती करताना दिसत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल'चा व्हायरल होत असलेला प्रोमो आता अनेकांना आवडत आहे. या प्रोमोच्या पोस्टमध्ये अनेकजण कमेंट करून हा एपिसोड नक्की पाहणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवीन प्रोमो रिलीज : कपिल शर्मानं प्रोमोमध्ये रॅपर डिव्हाईनवर खिल्ली उडवताना म्हटलं, "गुन्हेगार, गली गँग, पाप पुण्य इत्यादी शीर्षक तुझ्या रॅपचे आहे, तुम्ही लेखकाला तिहार तुरुंगातून कामावर घेतले आहे का?" कपिलच्या या विधानावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले. यानंतर कपिल शर्मानं बादशाहला विचारलं, "पाजी, तुम्हाला फॅनमुळे कधी काही त्रास झाला का ?" यावर बादशाहनं सांगितले की, "माझी एका चाहत्याबरोबर वॉशरूममध्ये भेट झाली होती, यावेळी त्यानं मला सेल्फी मागितली होती." बादशाहच्या या खुलाशानंतर सर्वजण पुन्हा एकदा हसू लागले. 'ओ सजना' या गाण्यासाठी बादशाहनं डिव्हाईन आणि निकिता गांधीबरोबर काम केलंय.

बादशाहचं वर्कफ्रंट : 'ओ सजना' गाणं मार्चमध्ये रिलीज झालं होतं. हे गाणं बादशाह, डिव्हाईन आणि निकिता गांधी यांनी एकत्र गायलं होतं. या गाण्याचे बोल बादशाह, डिव्हाईन, राजेश रोशन आणि आनंद बक्षी यांनी लिहिले होते. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा एपिसोड येत्या शनिवारी रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल. कपिल शर्माचा हा शो 192 देशात दिसतो. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान बादशाहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अलीकडेच जगातील 6 व्या सर्वात मोठ्या संगीत महोत्सवात सुंदर परफॉर्मेंस देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होत.

हेही वाचा :

  1. पवन कल्याणनं घेतली आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, चिरंजीवीचा घेतला आशीर्वाद - Pawan Kalyan took oath
  2. चंकी पांडेनं आदित्य रॉय कपूरबरोबर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी विचाराला 'हा' विशेष प्रश्न - Aditya roy kapoor and chunky pandey
  3. आदर्श जोडीदार कशी हवी? कार्तिक आर्यननं 'ही' व्यक्त केली अपेक्षा - Kartik Aaryan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.