ETV Bharat / entertainment

७० एमएम स्क्रीनची मजा ७० सेंटीमीटरच्या मोबाईल स्क्रीनवर मिळणार नाही! : श्रुती मराठेची खास मुलाखत - interview with Shruti Marathe - INTERVIEW WITH SHRUTI MARATHE

interview with Shruti Marathe : 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा चित्रपट आज 29 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये श्रुती मराठे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या कथानकाविषयी, अनेक अनुभव तिनं यानिमित्तानं सांगितलेत. यात श्रुती काय म्हणाली ही जाणून घेण्यासाठी वाचा.

Shruti Marathe
श्रुती मराठे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 5:20 PM IST

मुंबई - interview with Shruti Marathe : अभिनेत्री श्रुती मराठेनं 'सनई चौघडे' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच तिला 'इंदिरा विझा' या तामिळ चित्रपटात काम मिळालं. श्रुती मराठी हिंदीचित्रपटामध्ये काम करतेच, तसेच तिचा तामिळ आणि कन्नड मनोरंजनसृष्टीतही वावर असतो. दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ती श्रुती मराठे हे नाव न वापरता श्रुती प्रकाश असं नाव लावते. 'पेशवाई' मधून बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत आलेल्या श्रुतीला 'राधा ही बावरी' या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'जागो मोहन प्यारे' मधील तिच्या भूमिकेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता 'रमा माधव', 'तप्तपदी', 'बंध नायलॉनचे', 'बुधिया सिंग – बॉर्न टू रन', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर' सारख्या चित्रपटांतून श्रुती झळकली असून तिची भूमिका असलेला नवीन मराठी चित्रपट 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित झालाय. आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांनी श्रुती मराठेची भेट घेतली आणि गप्पा मारल्या त्यातील काही अंश.

तुझा 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा नवीन चित्रपट येऊ घातलाय. त्यातील तुझी भूमिका आणि अनुभव याबाबद्दल काय सांगशील ?

'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर'मध्ये मी अदिती या तरुणीची भूमिका करीत आहे. ती एक फॅशन डिझाइनर असून तिचे ५-६ मित्र मैत्रिणी यांच्यासोबतच्या घटनांचा कोलाज म्हणजे हा चित्रपट. यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर साटम, उमेश कामत, आनंद इंगळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी आहेत. या सर्वांबरोबर काम करताना मजा तर आलीच परंतु बरंच काही शिकायला मिळालं. हा चित्रपट मैत्री आणि नात्यांवर बेतला असून चाळिशीनंतर प्रत्येकात घडणारे बदल यातून अधोरेखित करण्यात आले आहेत. बऱ्याचदा बऱ्याच जणांना मनातील बोलता येत नाही. चाळिशीपर्यंत अनुभवांचे गाठोडे सोबत असते आणि निसर्ग नियमांप्रमाणे वागण्यात बदल घडत असतो. यात आम्ही सात मित्र मैत्रिणी आहोत आणि कुणाची जोडी कुणासोबत आहे हे ट्रेलरमधून उघड करण्यात आलेले नाहीये. तसेच ट्रेलर मध्ये दोन आवाज ऐकू येतात, एक किस चा तर दुसरा थप्पड मारल्याचा. हे काय गौडबंगाल काय आहे हें चित्रपट पाहिल्यावरच समजेल. (हसते).

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

किस बद्दल मराठी प्रेक्षक काही ऑब्जेक्शन घेतील असे वाटते?

अजिबात नाही. ट्रेलरमध्ये फक्त आवाज ऐकू येतो. तसेच किसची काय गम्मत आहे याची आमच्याशिवाय कोणाला कल्पना नाहीये. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी प्रेक्षक प्रगल्भ झालाय, हुशार झालाय. त्यामुळं मला नाही वाटत की कोणी काही ऑब्जेक्शन घेईल. तसेच मराठी प्रेक्षक नवीन आयडीयाज, सब्जेक्ट्सची वाट बघत असतो. आमचं कर्तव्य हे आहे की ते त्याच्यापर्यंत नीटपणे पोहोचवणे. आमचा सिनेमा फॅमिली ऑडियन्ससाठी असून भरपूर मनोरंजन करणारा आहे.

हा चित्रपट एका नाटकाचा रिमेक आहे. चित्रपटासाठी कुठले बदल केले आहेत?

नाटक आणि सिनेमा ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत आणि अर्थातच बदल हे असणारच. दोघांच्या सादरीकरणामध्ये फरक असतो. नाटकांमध्ये कट्स, रिटेक्स नसतात. तसेच सिनेमांतून सीन्सची दृश्यमानता वाढविता येते. चित्रपटात संधी मिळते कथानक वेगळेपणाने दाखवण्याची. परंतु कुठले बदल आहेत ते तुम्ही चित्रपट पाहून ठरवा.

मराठी चित्रपटांना प्रेक्षक उपस्थिती कमी असते यावर तू काय सांगशील?

हो. हे खरं आहे. परंतु उत्तम मार्केटिंग आणि माऊथ पब्लिसिटी हे चित्र बदलू शकते. काही गोष्टींत आपण कमी पडतोय तरीही चित्रपट लोकांपार्यंत पोहोचण्यासाठी माऊथ पब्लिसिटी ची गरज आहे. लोकांना ओटीटी वर चित्रपट पाहण्याची सवय जडली आहे. त्यांन ज्ञात करून दिले पाहिजे की ७० एम एम स्क्रीन ची मजा ७० सेंटीमीटरच्या मोबाईल स्क्रीनवर मिळणार नाही. त्यामुळं प्रेक्षकांनी कृपया चित्रपटगृहांत जाऊनच सिनेमे पाहावेत.

तुमच्या 'ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स'च्या फ्रंटवर सध्या काय चालू आहे?

'ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स'ची निर्मिती असलेली पहिली मराठी मालिका 'नवा गडी नवं राज्य'ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही, मी आणि माझा नवरा गौरव घाणेकर, मालिकेच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभारी आहोत. खरंतर मी निर्माती बनण्याचे श्रेय गौरवला देईन. मी अभिनयक्षेत्रात छान रमले होते आणि पुढेही अभिनयच करायचा हे ठरवले होतं. परंतु गौरवने मला निर्मितीक्षेत्रात उतरण्याचा सल्ला दिला आणि मी खूष आहे. निर्मितीक्षेत्र खूप कष्टप्रद असले तरी मी अनुभवसंपन्न झाले. आता आम्ही आमच्या पुढच्या निर्मितीच्या तयारीत आहोत.

हेही वाचा -

  1. ‘वहिनी नमस्कार’ म्हणताच आलिया भट्ट लाजून झाली गोरी मोरी, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt at Mumbai airport
  2. ज्येष्ठ नागरिकांना युजलेस समजणाऱ्यांना चपराक देण्यासाठी महेश मांजरेकर आणताहेत 'जुनं फर्निचर' - Mahesh Manjrekars Juna Furniture
  3. Crew X Review: तब्बू, करीना आणि क्रितीच्या विक्षिप्त कॉमेडी 'क्रू'ला नेटिझन्सकडून थंब्स अप - Crew X Review

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.