ETV Bharat / entertainment

प्रेक्षकांना हादरवून सोडणाऱ्या 'स्क्विड गेम' वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टिझर लॉन्च

Squid Game2 web series : 'स्क्विड गेम' या जगभर गाजलेल्या कोरियन मालिकेच्या दुसऱ्या सीझनचा टिझर लॉन्च झाला आहे. यामध्ये सेओंग गि-हुन पुन्हा एकदा दिसणार आहे.

Squid Game2 web series
'स्क्विड गेम' ((Photo: Series Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 1, 2024, 6:12 PM IST

मुंबई - 'स्क्विड गेम' नावाची एक कोरियन मालिका नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाल्यानंतर जगभरातील प्रेक्षकांना एक हादरा बसला होता. जगात कुणीही कल्पना केली नसेल असं कथानक असलेला हा शो पाहून लोक अस्वस्थ झाले होते. एका अफाट मोठ्या बक्षिसाची ( 45.6 अब्ज वॉन ) रक्कम जिंकण्यासाठी स्पर्धक गेम शोमध्ये भाग घेतात आणि अतिशय साधे वाटणारे लहानपणीचे खेळ खेळतात. खेळातून बाद होणं हा प्रत्येक खेळाचा एक नियम असतो त्या प्रमाणे याही खेळात बाद होतात, पण ते खेळातून नव्हे तर आयुष्यातूनच आऊट होतात. थोडक्यात खेळातून बाद होणं म्हणजे मरण पत्करणं. तर 'स्क्विड गेम' ही मालिका नेटफ्लिक्सवर आली आणि आजवर जगात सर्वाधिक पाहिली गेलेली मालिका ठरली.

आता याच 'स्क्विड गेम' मालिकेचा दुसरा भाग येणार आहे. त्याचा एक अपेक्षित टिझर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सेओंग गि-हुन रेड लाइट आणि ग्रीन लाइटमध्ये स्पर्धकांच्या नवीन गटासह खेळताना दिसत आहे. 'स्क्विड गेम'च्या दुसऱ्या सीझनची कथा पहिल्या सीझनच्या शेवटी सेओंग गि-हुनने घेतलेल्या निर्णयांवरून पुढे सुरू होईल. सेओंग अमेरिकेला जाण्याचा विचार कसा सोडून देतो आणि एका उद्देशाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात करतो हे यात पाहता येईल. या मालिकेचे दिग्दर्शन ह्वांग डोंग-ह्युक यांनी केले असून फर्स्टमन स्टुडिओची निर्मित आहे.

स्क्विड गेम' या मालिकेच्या नव्या सीझनमध्ये कोरियन वेब सिरीजमधील जो यू री आणि यिम सी वान यांच्यासारखे काही लोकप्रिय कलाकरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा या मालिकेबद्दलची अपेक्षा वाढली आहे. 'स्क्विड गेम सीझन 2' चा प्रीमियर 26 डिसेंबर 2024 रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे.

'स्क्विड गेम'चा प्रवास तिसऱ्या सीझनसह संपणार - 'स्क्विड गेम' ही कोरियन वेब सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन 2021 मध्ये रिलीज झाला होता. जगभरातील प्रेक्षकांना तो खूप आवडला. मालिका संपल्यापासूनच प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहू लागले. निर्मात्यांनी प्रेक्षकांची कठोर चाचणी घेतली आणि दुसरा सीझन आणण्यासाठी तीन वर्षे लागली. या नव्या सिझनमध्ये काही जुन्या पात्रांबरोबरच नवीन पात्रही पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचा तिसरा सीझन 2025 मध्ये येणार आहे. सीझन 3 सह ही मालिका समाप्त होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.