ETV Bharat / entertainment

तेरी बातों में ऐसा उल्झा जिया : व्हॅलेंटाईन डे साठी परफेक्ट पिक्चर म्हणत प्रेक्षकांनी केले शाहिद-क्रितीच्या रोम कॉमचे कौतुक

TBMAUJ X Review: शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला. पहिल्या दिवशी पहिला शो पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाबद्दलची आपली मते सोशल मीडिया एक्सवर व्यक्त केली आहेत. या चित्रपटाला बहुतांशी प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

TBMAUJ X Review
तेरी बातों में ऐसा उल्झा जिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 12:19 PM IST

मुंबई - TBMAUJ X Review: शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांची मुख्य भूमिका असलेला 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट अखेर शुक्रवारी सिनेमागृहात दाखल झाला. गेल्या वर्षी त्याच्या ओटीटी प्रोजेक्ट्स 'फर्जी' आणि 'ब्लडी डॅडी'सह चाहत्यांना खूश केल्यानंतर शाहिद कपूर ते नवीन 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटासह दोन वर्षांनंतर सिनेमागृहात परतला. दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज निर्मित या चित्रपटात क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहे आणि अमित जोशी आणि आराधना साह या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा एक साय-फाय रोमान्स कॉमेडी म्हणून प्रचार झालेला चित्रपट आहे. यामध्ये क्रिती सेनॉनने सिफ्रा (सुपर इंटेलिजेंट फीमेल रोबोट ऑटोमेशन) नावाच्या रोबोटच्या भूमिकेत आहे, तर शाहिद कपूर आर्यन नावाच्या एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. लांब लचक शीर्षक असलेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट पाहणाऱ्यांनी त्याच्या ट्रेलर आणि संगीताला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. हा शाहिद कपूरचा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यात तो क्रिती सेनॉनची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देतो. तो ज्या स्त्रीच्या प्रेमात पडला आहे ती प्रत्यक्षात एक रोबोट आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, पोस्टर्स आणि गाण्यांनी फिल्मी जगतात खळबळ उडवून दिली आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शाहीद-क्रिती ब्लॉकबस्टरचे पहिले रिव्हयु बहुतेक सकारात्मक आहेत. शाहिद आणि क्रितीच्या अत्यंत अपेक्षित कौटुंबिक मनोरंजनाबद्दल प्रेक्षक सकारात्मक वाटत आहेत.

सोशल मीडिया X वर चित्रपट पहाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एक युजर लिहितो, ''साय फाय टचसह गोड रोम-कॉम. ही एक सुंदर आणि विनोदाने भरलेली प्रेमकथा आहे. शाहिद कपूरला कॉमिक भूमिकेत पाहून आनंद झाला आणि क्रिती सेनॉनच्या रोबोटनं मला भरपूर हसवलं. व्हॅलेंटाईन डे साठी एक परिपूर्ण चित्रपट.''

दुसऱ्याने लिहिले: "'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा एक आनंददायक रोम-कॉम आहे जो त्याच्यातील गोड पात्रं आणि हृदयस्पर्शी कथानकासह आकर्षकपणे आणि बुद्धीने प्रेमाचे सार कॅप्चर करतो."

आणखी एकाने या चित्रपटाची स्तुती करताना पोस्ट केले: "हा एक सुंदर कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. हा चित्रपट "जब वी मेट" च्या मार्गाने जाईल. सहज 150 कोटींहून अधिक कमाई करेल. शाहिद कपूर एक हिरा आहे आणि उत्कृष्ट आहे. क्रिती सेनॉननेही अभिनयात कमाल केली आहे. सिक्वेलची वाट पाहत आहे."

रिलीज होण्यापूर्वी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चे गुरुवारी विशेष स्क्रीनिंग मुंबईत पार पडले. शाहीदची पत्नी मीरा राजपूतने स्क्रिनिंगला हजेरी लावली आणि चित्रपटाचे कौतुक केले. मीराने इंस्टाग्राम स्टोरीजवर शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटातील एक स्टिल अपलोड केले आणि त्याला कॅप्शन दिले: "संपूर्ण दंगा आणि हास्य कल्लोळ! खूप खाळानंतरचे ओव्हरलोडमनोरंजन ! प्रेम, हास्य, मस्ती, नृत्य आणि शेवटी हृदयस्पर्शी संदेश." मुख्य कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलताना तिने लिहिले, "क्रिती सेनॉन, तू पिच-परफेक्ट होतीस. शाहिद कपूर द ओजी लव्हर-बॉय, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तू माझे हृदय जिंकलेस."

हेही वाचा -

  1. 'लाल सलाम' रिलीज प्रसंगी रजनीकांतच्या चाहत्यांचा जल्लोष, भव्य कटआऊट्ससह आतिषबाजी
  2. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग जोरदार सुरू
  3. 'खाशाबा' चित्रपटात शहाजी महाराजांची भूमिका साकारणार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.