ETV Bharat / entertainment

रजनीकांत आणि बिग बी स्टारर 'वेट्टियान'चा बॉक्स ऑफिसवर दसरा धमाका

Vettiyan Box Office : रजनीकांत आणि अमिताभ बच्चन स्टारर 'वेट्टियान' चित्रपट रिलीज झाला आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईवर एक नजर टाका.

Vettiyan Box Office
'वेट्टियान' बॉक्स ऑफिस ((Photo: Film poster/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 12:40 PM IST

Updated : Oct 11, 2024, 1:48 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन आज आपला वाढदिवस साजरा करत असताना तब्बल 30 वर्षांनंतर त्यांचा रजनीकांतबरोबरचा 'वेट्टियान' चित्रपट रिलीज झाल्यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. दोन महान सुपरस्टार्स अजूनही प्रेक्षकांना कसे मोहित करून सोडतात याचं हे उत्तम उदाहरण आहे.

'वेट्टियान' पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

टीजे ज्ञानवेल यांनी दिग्दर्शित केलेला 'वेट्टियान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार सुरूवात केली आहे. विजय थलपतीच्या 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' (GOAT) या चित्रपटानंतर रजनीकांत आणि बिग बीच्या या नव्या चित्रपटानं दुसरं सर्वोत्तम ओपनिंग मिळवलं आहे. 10 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी संपूर्ण भारतात 30 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली आहे. या चित्रपटानं तामिळनाडूमध्ये उत्तम कमाई करत 26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सॅकनिल्कच्या आकड्यानुसार देशभरातील कमाई

तमिळ: रु 26.15 कोटी

तेलुगु: रु. 3.2 कोटी

हिंदी: रु ०.६ कोटी

कन्नड: रु ०.०५ कोटी

एकूण: ३० कोटी रुपये (प्रारंभिक अंदाज)

'वेट्टियान' रजनीकांतच्या 'जेलर'शी बरोबरी करु शकला नाही

'वेट्टियान'नं बॉक्स ऑफिसवर उत्तम सुरूवात केली असली तर थलपती विजयच्या GOATचित्रपटाच्या सुरुवातीच्या आकड्यांना मागे टाकू शकलेला नाही. त्या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई 44 कोटींची होती आणि यात तमिळ सिनेमाचा 39 कोटी इतका सिंहाचा वाटा होता. याशिवाय वेट्टियाननं रजनीकांतचा मागील 'जेलर' चित्रपटाच्या कमाईशीही स्पर्धा केलेली नाही. 'जेलर'ची कमाई पहिल्या दिवशी तब्बल 48.35 कोटी इतकी झाली होती. येत्या काही दिवसांत, विशेषत: दसऱ्याच्या सुट्ट्यांमुळे 'वेट्टियान'ला चांगला फायदा मिळू शकेल, असे उद्योग तज्ञांचे म्हणणे आहे.

दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांनी 'वेट्टियान' हा व्यावसायिक मनोरंजन करणारा चित्रपट म्हणूनच बनवला आहे. असं असलं तरी रजनीकांतच्या अलीकडच्या यशाच्या तुलनेत चित्रपटाच्या कमाईचं संकलन कमी पडल्याचे प्रारंभिक अंदाज सूचित करतात. पुढील काही दिवस 'वेट्टियान'साठी महत्त्वपूर्ण असतील, कारण वीकेंडमध्ये स्थिर संकलन राखण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. शिवाय चित्रपटाबद्दल माऊथ पब्लिसिटीचाही फायदा होऊ शकतो.

दसऱ्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'वेट्टियान'ला सकारात्मक प्रतिसाद मिळत राहिल्यास चित्रपटाकडे अधिक प्रेक्षक आकर्षित करण्याची क्षमता आहे. हा चित्रपट रजनीकांतच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटांच्या उंचीवर जाऊ शकतो आणि तमिळ चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतो. यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी पडद्यावर त्यांची जादू पुन्हा दाखवल्यामुळे 'वेट्टियान' त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीतील हा एक संस्मरणीय चित्रपट ठरु शकतो.

हेही वाचा -

'वेट्टियान'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक्स रिव्ह्यू

Last Updated : Oct 11, 2024, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.