ETV Bharat / entertainment

धर्मेंद्रसोबतच्या किंसिंग सीनमुळे तब्बूनं उडवली शबाना आझमीची खिल्ली - शबाना आझमी किंसिंग सीन

मुंबई - Shabana Azmi : शबाना आझमीन यांनी एक मुलाखतीदरम्यान किंसिंग सीनमुळे तब्बूनं खिल्ली उडवल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील किंसिंग सीनचं श्रेय करण जोहरला दिलं आहे.

shabana azmi
शबाना आझमी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 12:18 PM IST

मुंबई - Shabana Azmi : दिग्गज अभिनेत्री शबाना आझमीनं आपल्या अभिनयानं सर्वांची मने जिंकली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहेत, मात्र त्याचा नुकताच रिलीज झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट खूप चर्चेत राहिला. या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार परफॉर्मन्स दिला. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांचा एक सीन होता, जो अनेकांना खूप आवडला. शबाना आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी शबाना यांना फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी नामांकन मिळाले होते आणि त्यांना हा पुरस्कारही मिळाला आहे.

तब्बूनं खिल्ली उडवली : शबाना यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, या सीनमुळे तब्बूनं एकदा त्यांची खिल्ली उडवली होती. यावर बोलताना त्या म्हणाल्या, ''तब्बू ही माझी भाची आहे, ती खूप चावट आहे. तिनं एकदा मला म्हटलं होत की, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधील किसिंग सीन करून तुम्ही इंडस्ट्री हादरवली आहेस. आता तुमच्या वयाच्या सर्वचं महिला म्हणत आहेत की, चित्रपटात किसिंग सीन असेल तर आम्ही काम करू.'' पुढं त्यांनी म्हटलं, ''तिच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट आहे, पण प्रेक्षकांना ते पाहून आश्चर्य वाटले. प्रेक्षक थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवत होते. या सीनचे श्रेय मी करण जोहरला देते.''

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील सीन : शबाना आझमी यांनी पुढं सांगितलं की, त्यांचा या चित्रपटामधील आवडता सीनं आलियासोबतचा आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट येऊन त्यांच्याशी रागानं बोलते की, तिनं तिच्या पतीला का फसवलं. हा सीन शबाना आझमीचा आवडता सीन आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये शबाना आझमी आणि धर्मेंद्र व्यतिरिक्त जया बच्चन, तोता रॉय चौधरी , अंजली आनंद, क्षिती जोग, नमित दास, रोनित रॉय यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 च्या हिट चित्रपटांपैकी एक आहे.

हेही वाचा :

  1. जंगी स्वागतानंतर घरी परतलेल्या मुनावर फारुकीच्या मुलांनं केलं बाबाचं कौतुक
  2. शाहिद कपूरची क्लिप पाहून तुम्हीही रोखू शकणार नाहीत हसू, पाहा व्हिडिओ
  3. 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' पुरस्कार सोहळ्याला मनोज बाजपेयी, सुनील गावस्करसह दिग्गजांची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.