ETV Bharat / entertainment

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'रोशन सिंग सोढी बेपत्ता, जेनिफर बन्सीवालनं दिली प्रतिक्रिया... - Gurucharan Singh Missing

Jennifer Mistry on Gurucharan Singh Missing :'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधील रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाला आहे. आता यावर जेनिफर बन्सीवालनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Etv Bharat
तारक मेहता का उल्टा चष्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 11:58 AM IST

मुंबई - Jennifer Mistry on Gurucharan Singh Missing : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये 'रोशन सिंग सोधी'ची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याच्या बातमीनं आता सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या शोमध्ये पत्नीची भूमिका साकारणाऱ्या मिसेस रोशन सोढीला या बातमीमुळे धक्का बसला आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याच्या वृत्तावर जेनिफरनं एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. तिनं म्हटलं, "मला आशा आहे की तो जिथे असेल तिथे सुरक्षित असणार, हे खूप धक्कादायक आहे, तो सुरक्षित राहावा ही माझी इच्छा आहे. गुरुचरण खूप आध्यात्मिक आणि चांगला माणूस आहे."

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील रोशन सिंग सोढी बेपत्ता : जेनिफरला जेव्हा विचारण्यात आलं की, 2020 मध्ये जेव्हा त्यानं शो सोडला तेव्हा ती त्याच्या संपर्कात होती का? यावर तिनं म्हटलं, गेल्या जूनपासून मी त्यांच्या संपर्कात नाही, तेव्हापासून आम्ही एकमेकांशी बोललो नाही, त्याआधी आम्ही संपर्कात होतो. त्यानं मला तारक मेहताचे 4 हजार एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचे मेसेज पाठवले होते. दरम्यान गुरुचरणच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत लिहिलं आहे, "माझा मुलगा गुरुचरण हा 50 वर्षांचा आहे, तो 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता फ्लाइटद्वारे मुंबईला रवाना झाला. मात्र तो मुंबईला पोहोचला नाही आणि घरी देखील आला नाही. त्याचा फोन देखील काम करत नाही. तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे, आम्ही त्याचा शोध घेत आहोत, पण अद्याप तो सापडला नाही."

गुरुचरणनं वडिलांच्या प्रकृती बिघडल्यानंतर सोडला होता शो : गुरुचरणनं चार दिवसांपूर्वी आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो आपल्या वडिलांबरोबर खूप आनंदी दिसत होता. गुरुचरण सिंग शेवटी टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये दिसला होता. या शोमध्ये तो रोशन सिंग सोढीची भूमिका साकारून प्रसिद्ध झाला. त्याच्या पत्नीची भूमिका जेनिफर मिस्त्री बन्सीवालनं केली होती. वडिलांच्या प्रकृती बिघडल्यानं त्यानं हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. या शोच्या निर्मात्यानं काही कलाकारांचे पैसे दिलेले नव्हते, मात्र जेनिफर प्रकरणानंतर निर्मात्याला सर्वांचे पैसे द्यावे लागले.

हेही वाचा :

  1. 20 वर्षांनी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला विजयचा ‘घिल्ली’, चित्रपटाची कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकित - Thalapathy Vijay
  2. महिलांच्या हक्कांविषयी जागृत करणारी प्रियांका चोप्रा जोनास निर्मित डॉक्युमेंटरी, "WOMB"! - Priyanka Chopra
  3. "मला वाद घालायचा नाही", म्हणत अरबाज खाननं दिलं मलायका अरोराला उत्तर - Arbaaz Khan on Malaika Arora

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.