मुंबई - Gurucharan Singh Missing Case : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग याच्या बेपत्ता झाल्याचं प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. याप्रकरणी पोलीस 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे स्टार्स, त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांची चौकशी करत आहेत. गुरुचरण सिंग 22 एप्रिल 2024 पासून बेपत्ता आहेत. त्याला बेपत्ता होऊन 11 दिवस झाले आहेत. तरीही त्याचा आतापर्यत पत्ता लागलेला नाही. गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईत येणार होता. मात्र तो परत आला नाही. यानंतर त्याचा फोनही बंद आला.
गुरचरण सिंग बेपत्ता प्रकरण : दरम्यान, याप्रकरणात दिल्ली पोलिस आता चौकशी करत आहे. काही दिवसापूर्वी गुरचरण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी दाखल केली होती. 50 वर्षीय गुरचरणनं 2020 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो सोडला होता. तसेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शोची संपूर्ण स्टार कास्ट आणि निर्माता असित मोदी देखील गुरचरण गायब झाल्यामुळे चिंतेत आहे. दरम्यान आता या प्रकरणी दिल्ली पोलिसांचे काही अधिकारी मुंबईत पोहोचले आहेत. दिल्ली पोलीस 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची स्टार कास्ट, त्याचे नातेवाईक आणि मित्रांची चौकशी करत असून याप्रकरणी संपूर्ण माहिती गोळा करत आहेत.
गुरचरणचे शेवटचे लोकेशन दिल्लीत सापडल : तपासादरम्यान गुरुचरण सिंगचे शेवटचे ठिकाण दिल्ली असल्याचं निष्पन्न झालं. यासोबतच त्यानं एटीएममधून सात हजार रुपये काढल्याचं समोर आलं होतं. दरम्यान 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी यांनी गुरचरण बेपत्ता झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक मुलाखतीत म्हटलं, "ही अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक बातमी आहे. तो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करत होता. आई-वडिलांची संपूर्ण जबाबदारी त्यानं स्वत:वर घेतली होती. आम्ही कधीच एकमेकांबरोबर जास्त बोललो नाही, मात्र तो धार्मिक माणूस असल्याचं मला माहित आहे. त्याचं बेपत्ता होणं खूप धक्कादायक आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे, त्यामुळे नक्कीच काहीतरी निष्पन्न होईल, याबद्दल मला खात्री आहे. मी देवाला प्रार्थना करतो की तो सुरक्षित असावा."
हेही वाचा :