ETV Bharat / entertainment

तापसी पन्नूनं उदयपूरमध्ये बॅडमिंटनपटू मॅथियास बोशी केलं लग्न? फोटो व्हायरल - Taapsee pannu - TAAPSEE PANNU

Taapsee pannu wedding : अभिनेत्री तापसी पन्नूनं उदयपूरमध्ये लग्न केल्याचं समजत आहे. सोशल मीडियावर आता काही फोटो व्हायरल होत आहे. यावरुन तिनं लग्न केलं असल्याचा तर्क लावला जात आहे.

Taapsee pannu wedding
तापसी पन्नूचं लग्न
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 3:34 PM IST

मुंबई - Taapsee pannu wedding : अभिनेत्री तापसी पन्नूबाबत मोठी बातमी समोर येत आहे. तिनं बॅडमिंटनपटू मॅथियास बो यांच्याशी लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तापसी आणि मॅथियास बऱ्याचं काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तापसीच्या प्री-वेडिंग सुरूवात ही 20 मार्चपासून झाली असल्याचं म्हटलं जात आहे. आता 23 मार्च रोजी लग्न झालेल्या या लग्न सोहळ्यात कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते, असं सांगितलं जातंय. तापसीचं राजस्थानमधील उदयपूरमध्ये गुपचूप लग्न केल्याच्या बातम्याही झळकल्या आहेत.मात्र या जोडप्यानं लग्नाची घोषणा त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी खरंच लग्न केलंय की नाही याची खात्री अद्याप झालेली नाही. त्यांच्या लग्नात हिंदी चित्रपटसृष्टीमधून अनुराग कश्यप, पावेल गुलाटी आणि अभिलाष थपियाल हे उपस्थित होते, असंही सांगितलं जातंय.

तापसी पन्नूनं केलं लग्न? : आता सोशल मीडियावर पावेल गुलाटीनं या लग्नामधील एक फोटो शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तापसी लवकरच मुंबईत मित्र आणि सहकाऱ्यांसाठी पार्टी देणार आहे. आता पार्टीची ती लवकरच तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा केली जात आहे. लग्नाची फोटो शेअर करताना पावेल गुलाटीनं लिहिलं, ''ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आपण कुठे आहोत याची आपल्याला कल्पना नाही!'' तापसी तिच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलले नसली तरी तिला अनेकदा मॅथियासबरोबर पाहिले गेले आहे. काही आठवड्यांपूर्वी बातमी समोर आली होती की हे जोडपे शीख-ख्रिश्चन पद्धतीनं विवाह करणार आहे.

तापसीनं लग्नाबद्दल पोस्ट केली नाही : तापसीन काही दिवसांपूर्वी तिनं पीच कलरच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो उदयपूरमधील लग्नातील असल्याचे सांगण्यात येत आहेत. या लग्नात लेखिका कनिका ढिल्लननं देखील दिसली आहे. तिनं तापसी पन्नूबरोबर 'मनमर्जियां', 'डंकी' आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये काम केलंय. कनिकानं पती हिमांशू शर्माबरोबर या लग्नाला हजेरी लावली होती. तापसीनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर लग्नामधील विधी करतानाचे फोटो शेअर केलेले नाहीत. याशिवाय तिनं सोशल मीडियावर तिच्या लग्नाबद्दल कुठलीही पोस्ट शेअर केलेली नाही.

हेही वाचा :

  1. होळी पार्टीचा आनंद लुटण्यासाठी ही टॉप 5 गाणी प्ले तुमच्या लिस्टमध्ये नक्की सामील करा - Top 5 Holi Song
  2. बच्चन कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं साजरा केला 'होलिका दहन' उत्सव - Bachchan family Holika Dahan
  3. सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा होळी खेळतानाचा न पाहिलेला व्हिडिओ व्हायरल - Sushant and Ankita Video

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.