ETV Bharat / entertainment

Sushant Singh Rajput Sister : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं सीबीआय चौकशीकडे लक्ष देण्याची पीएम मोदींना केली विनंती - Sushant Singh Rajput Sister

Sushant Singh Rajput Sister : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं पीएम मोदींकडे न्यायासाठी अपील केली आहे. या प्रकरणातील सीबीआयचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे हे शोधून काढावे आणि सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी विनंती तिनं केली आहे.

Sushant Singh Rajput Sister
सुशांत सिंग राजपूतची बहिण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 2:46 PM IST

मुंबई - Sushant Singh Rajput Sister : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानं संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. त्यानं आत्महत्या केल्याचं बातम्यामध्ये दाखविण्यात आलं होतं. मात्र, यानंतर देखील प्रकरणाची आणखी चौकशी सुरू करण्यात आली. आतापर्यत सुशांत केस प्रकरणी कुठलीही अपेडट आली नाही. दरम्यान सुशांत सिंग राजपूतची बहिणी श्वेता सिंह किर्तीनं पीएम मोदींकडे न्यायासाठी आवाहन केलं आहे.

सुशांत सिंहची बहिणनं पीएम मोदींकडे केली विनंती: सुशांतच्या मृत्यूमुळे हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे लोकांच्या नजरेतून खाली गेलं होतं आणि सुशांतच्या चाहत्यांनी सर्व स्टार्सवर नेपोटिझमचे आरोप करत त्यांना निशाणावर धरले होते. सुशांत सिंह जाऊन 45 महिने झाले आहेत, मात्र आतापर्यत सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. गेल्या 4 वर्षांपासून सुशांतचे कुटुंब न्यायासाठी इकडून तिकडे भटकत आहे. श्वेता सिंह किर्तीनं शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या भावाचे निधन होऊन 45 महिने झाले आहेत आणि आम्ही अजूनही उत्तर शोधत आहोत, पीएम मोदीजी कृपया आम्हाला मदत करा आणि सीबीआय तपास कुठपर्यत पोहोचला आहे ते शोधा. आम्हाला सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा आहे.''

श्वेता सिंग किर्तीनं शेअर केला व्हिडिओ : याआधी सुशांत सिंह राजपूतची बहिण यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट कार्यक्रमात दिसली होती. तेथे श्वेतानं सीबीआयच्या तपासाच्या अहवालाविषयी सांगितलं होतं. या शोमध्येही श्वेता आपल्या भावाला न्याय न मिळाल्यानं निराश दिसली. श्वेताच्या कुटुंबीयांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंग कीर्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज शेअर करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. दरम्यान सुशांतनं 2013 मध्ये आलेल्या 'काई पो चे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांच्या निधनापूर्वीचा त्यांचा शेवटचा रिलीज 'दिल बेचारा' चित्रपट होता, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

  1. SRK teaches Ed Sheeran : शाहरुख खानने गायक एड शीरनला शिकवली त्याची आयकॉनिक सिग्नेचर पोज, पाहा व्हिडिओ
  2. Bastar the naxal story : 'बस्तर-द नक्सल स्टोरी' स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दोनदा वीज खंडित झाल्यानं जेएनयूमध्ये गोंधळ
  3. Laapataa ladies : सलमान खाननं किरण रावचं 'लापता लेडीज'साठी केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.