मुंबई - Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा भावनिक पोस्ट्सद्वारे आपल्या भावाची आठवण करताना दिसते. सुशांत सिंग राजपूतची 14 जून रोजी चौथी पुण्यतिथी आहे. यामुळे त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती केदारनाथला गेली होती. आता तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
श्वेता कीर्तीनं पोस्टमध्ये लिहिलं, " चार वर्षांपूर्वी याच महिन्याच्या 14 तारखेला आम्ही आमच्या प्रिय सुशांतला गमावले. आजही आपण त्या दुःखद दिवशी काय घडले याचं उत्तरे शोधत आहोत. मी केदारनाथला प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी आले आहे. केदारनाथला उतरताच अश्रू वाहू लागले. मी थोडावेळ चालले. माझ्या आजूबाजूला त्याची उपस्थिती जाणवली. मला त्याला मिठी मारण्याची जबरदस्त इच्छा जाणवली होती. त्यानं जिथे ध्यान केले होते, तिथे मी बसले. तिथे ध्यान केले. त्या क्षणी मला वाटले की, तो अजूनही माझ्याबरोबर आहे. माझ्या आत आहे. माझ्याद्वारे जगत आहे."
श्वेता सिंह कीर्तीची पोस्ट : पुढं तिनं लिहिलं, "काल फाटा येथे इंटरनेट कनेक्शन नव्हते. माझ्या कारमध्ये बसताना मी इंस्टाग्राम उघडण्यात यशस्वी झाले. माझ्या फीडमध्ये फक्त एक फोटो दिसला, केदारनाथमधील भाईचा फोटो होतो. सुशांतचा साधूबरोबरच्या या फोटोबद्दल मला माहित होते. मला त्या साधूला भेटायचं होतं. देवाच्या कृपेनं मी भेटू शकले. आता मी या संदर्भात काही फोटो शेअर केले आहेत. हे घडवून आणल्याबद्दल देवाचे आभार." याशिवाय पोस्टच्या पार्श्वभूमीत तिनं अमित त्रिवेदीचं 'नमो नमो' हे गाणेही जोडलं आहे. आता शेअर केलेल्या फोटोमध्ये ती सुशांतप्रमाणे मंदिरात ध्यान करताना दिसत आहे. त्यानंतर ती अघोरी साधूकडून आशीर्वाद घेत आहे. आता अनेकजण तिच्या फोटोवर कमेंट्स करून या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया : एका चाहत्यानं या फोटोवर लिहिलं, "सुशांतचा हा फोटो पाहून त्याची खूप आठवण येत आहे. दुसऱ्या एकानं लिहिलं, "लवकर न्याय मिळो. देव तुझ्या पाठीशी आहे. विजयी होशील. आणखी एकानं लिहिलं, "जय केदारनाथ, जय भोलेनाथ देवा. सुशांत भाऊला आपल्या श्री चरणात स्थान द्या." या पोस्टवर अनेकजण काहीजण हार्ट शेअर करत आहेत.
हेही वाचा :
- प्रीती झिंटा सहा वर्षानंतर बॉलीवुडमध्ये परतणार, पोस्ट शेअर करत दाखवली 'लाहोर 1947'ची झलक - preity zinta share post
- सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case
- "भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकायचं की भविष्याचा वेध घ्यायचा..." : अर्जुन कपूरची गूढ पोस्ट - Arjun Kapoor Cryptic Post