ETV Bharat / entertainment

'ओ स्त्री रक्षा करना'!! 'मुंज्या'बरोबर 'स्त्री 2' चा टीझर रिलीज, थिएटरमध्ये झाला टाळ्यांचा कडकडाट - Stree 2 teaser - STREE 2 TEASER

Stree 2 teaser : राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री 2' या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर अखेर रिलीज झाला आहे. हा टीझर सोशल मीडियावर नाही तर थेट थिएटरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Stree 2 teaser
'स्त्री 2' चा टीझर (स्त्री 2 (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 6:10 PM IST

मुंबई - Stree 2 teaser : 2018 मध्ये रिलीज झालेल्या हॉरर-कॉमेडी 'स्त्री' चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि तेव्हापासून लोक त्याच्या सीक्वलची आतुरतेनं वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून निर्मात्यांनी त्याचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही तर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आलाय.

'मुंज्या' चित्रपटाच्या मध्येच 'स्त्री 2' चा टीझर रिलीज करून एक नवीन ट्विस्ट निरमात्यांनी दिला आहे. हा टीझर आता सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे आणि लोकांना खूप आवडला आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चा टीझर 'मुंज्या' चित्रपटाबरोबर थेट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये एक भयानक आणि मजेदार सिक्वेल आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपटाशी स्पर्धा होणार आहे. राजकुमार राव, श्रद्धा कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि इतर कलाकार आहेत.

राजूकमार-श्रद्धा पुन्हा मनोरंजनासाठी सज्ज

'स्त्री' 2018 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट दिनेश विजानच्या भयपटाच्या विश्वाचा एक भाग आहे. 'स्त्री 2' अधिक मजेदार आणि धडकी भरवणारा असेल आणि या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर बनवण्याची तयारी देखील निर्मात्यांनी सुरू केली आहे. राजकुमार राव आणि श्रद्धासह त्याचे मित्र त्यांच्या केमिस्ट्रीसह चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी परत आले आहेत. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सने बनवला आहे.

स्त्रीनं जिंकली प्रेक्षकांची मनं

राजूकमार राव-श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री' या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही शानदार कामगिरी केली. 2018 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटानं भारतात 129.90 कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता निर्माते 'स्त्री 2' घेऊन येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरेल असा दावा निर्मात्यांनी केला आहे.

हेही वाचा -

अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ही जोडी 25 वर्षानंतर 'घरत गणपती' चित्रपटात पुन्हा एकत्र - Gharat Ganapati

शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे म्हणताहेत 'थोडं तुझं आणि थोडं माझं'! - Thod Tujm Aag Thod Mazan

'बॉर्डर 2' ची रिलीज डेट ठरली, थिएटरमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा - Border 2 Release Date

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.