ETV Bharat / entertainment

'स्त्री 2'मधला 'सरकटा' सुनील कुमार होणार 'बिग बॉस 18'चा स्पर्धक - Stree 2 Sarkata - STREE 2 SARKATA

Sarkata in Bigg Boss 18: सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस 18'मध्ये 'स्त्री 2'मधील सरकटेची व्यक्तिरेखा साकारणार सुनील कुमार हा सहभागी होणार आहे. याबद्दल खुद्द सुनीलनं एका मुलाखतीदरम्यान पुष्टी केली आहे.

Sarkata in Bigg Boss 18
सरकटा बिग बॉस 18मध्ये दिसेल ('बिग बॉस 18' (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 28, 2024, 10:14 AM IST

मुंबई - Sarkata in Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' हा शो लॉन्च होण्यापूर्वीच चर्चेत आहे. यावेळी निर्माते कोणाला घरात प्रवेश देणार यावर प्रेक्षक आणि चाहते अंदाज लावत आहेत. दरम्यान, या शोबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 'स्त्री 2' मधील 'सरकटा'ची भूमिका साकारणारा सुनील कुमार यात झळकणार आहे. 'बिग बॉस 18'चा प्रीमियर 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. 'स्त्री 2' मधील 'सरकटा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम सुनीलला मिळालं आहे. सुनीलला 'बिग बॉस 18'साठी अप्रोच केल्याची पुष्टी आता झाली आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत.

'बिग बॉस 18'मध्ये 'सरकटा'ची होणार एंट्री : सुनील कुमार हा जम्मूमधील पोलीस अधिकारी आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या 'स्त्री 2'मधील 'सरकटा'ची भूमिका अनेकांना आवडली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत सुनीलनं पुष्टी केली की, सलमान खानच्या शोच्या आगामी सीझनसाठी त्याला संपर्क करण्यात आला होता. याविषयी बोलताना त्यानं म्हटलं, "मला नुकताच 'बिग बॉस'चा कॉल आला आहे. ऑक्टोबरमध्ये 'बिग बॉस' शोसाठी बोलवत आहे. सध्या मी 'बिग बॉस'ला वेळ देत आहे, कारण मी पोलीस खात्यामध्ये काम करतो. मला सुट्टी मिळण्यात फारशी अडचण येत नाही. आमचे पोलीस क्रीडा अधिकारी मला पाठिंबा देत असले तरी मला रजेसाठी विनंती करावी लागेल. जर मला चित्रपटासाठी, जाहिरातीसाठी आणि कुस्तीसाठी कुठेही जायचे असेल तर ते मला पाठिंबा देत असून कधीही सुट्टी देतात."

हे स्टार्स 'बिग बॉस 18' मध्ये सहभागी होऊ शकतात : या शोमध्ये सुनील कुमार व्यतिरिक्त अर्जुन बिजलानी, शोएब इब्राहिम, मानसी श्रीवास्तव, कशिश कपूर, विशाल पांडे, दिग्विजय राठी आणि इतर सेलिब्रिटी सहभागी होण्याची शक्यता आहे. आता काही दिवसात 'बिग बॉस 18' विषयी अपडेट मिळेल. दरम्यान 'स्त्री 2' चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. एरवी क्वचितच एखाद्या चित्रपटाला लाभणारा रिपीट ऑडियन्स 'स्त्री 2' ला लाभला आहे.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2'नं 12 दिवसात जगभरात 500 कोटीची केली 'कमाई' - STREE 2close to 600 cr at worldwide
  2. स्त्रीनं जगभरात केली 500 कोटींची कमाई, विकी कौशलला होतोय 'त्या' गोष्टीचा पश्चाताप - vicky kaushal
  3. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं केला धमाका, 400 कोटीचा टप्पा पार - Stree 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.